Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

रेनिसन्स स्कूलला टाळे

रेनिसन्स इंटरनॅशनल शाळेला अखेर टाळे!

Renaissance International School: लातूरच्या रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूलला शिक्षण विभागाने इयत्ता 6 वी ते 10 वीचे अनधिकृत वर्ग चालविण्याबद्दल टाळे ठोकले.


रेनिसन्स इंटरनॅशनल शाळेला अखेर टाळे

Renaissance International School |

शिक्षण विभागाचे धाडस; इयत्ता 6 वी ते 10 वीचे वर्ग अनधिकृत!

लातूर ( Renaissance International School ) : इयत्ता 6 वी ते 10 वीचे वर्ग अनधिकृत चालविणाऱ्या लातूर येथील रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूलला बुधवारी (दि.25) लातूरच्या शिक्षण विभागाने अखेर टाळे ठोकले. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय क्षीरसागर यांनी दिलेल्या आदेशानुसार माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी बी.के. हाश्मी यांनी ही कारवाई केली. या शाळेच्या अनधिकृत वर्गाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून तक्रारी होत्या. अंबाजोगाईच्या भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाची ही शाळा आहे.

लातूर शहरात 2019 पासून अनधिकृतपणे, शासनाची कोणतीही परवानगी नसताना नामांकित रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूल राजरोस सुरू होती. यातून हजारो पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक झाली. याविरोधात शिक्षण विभागास अनेकदा निवेदन दिली. तसेच काही संघटनांनी शाळेसमोर निदर्शने, आंदोलनेही केली.  याबाबत 17 जानेवारी 2025 ला युवा भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष श्री शेखर कांबळे यांनी सर्वप्रथम शिक्षण विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर 19 नोव्हेंबर 2025 ला शिक्षण विभागाने या शाळेच्या चौकशीसाठी पत्र काढले. मात्र चौकशीचे सोपस्कार गतीने होत नव्हते. त्यानंतर 25 फेब्रुवारी 2026 रोजी या शाळेच्या चौकशीबाबत लातूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र काढण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी करून त्याचा अहवाल 17 मार्च 2026 रोजी पाठविला.

लातूरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूल ची चौकशी करून आपला अहवाल पाठविला. या अहवालात 'सदरील विद्यार्थ्यांचे नजीकच्या शासनमान्य शाळेत समायोजन करून तीन दिवसात अहवाल सादर करण्यात येईल', असे संबंधितांनी दिलेले हमीपत्रही होते. मात्र तीन दिवस उलटूनही संबंधित शिक्षण संस्थेने व मुख्याध्यापकांनी शाळेतील इयत्ता 6 वी ते 10 वी चे अनधिकृत वर्ग बंद केले नाहीत. 

 त्यानंतर शिक्षण विभागाने शाळेला (Renaissance International School) भेट देऊन पंचनामा केला. यावेळी ही शाळा अनधिकृतपणे 6 वी ते 10 वी विनापरवाना चालू असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर शिक्षण विभागाने 24 मार्च 2026 रोजी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी  श्री हाश्मी बी.के. यांना पत्र देत रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूल लातूर या शाळेतील इयत्ता 6 वी ते 10 वी चे वर्ग अनधिकृत चालू असल्यामुळे सदर वर्ग तात्काळ बंद करण्याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना केली. तत्पूर्वी याबाबत 27 फेब्रुवारीला मनसेच्यावतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार उपशिक्षणाधिकारी बी.के. हाश्मी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बुधवारी रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूलला टाळे ठोकण्याची कारवाई केली.

दोन वर्ष शिक्षण विभागाला हुलकावणी
रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूल (Renaissance International School) लातूर या शाळेतील इयत्ता 1 ली ते 5 वी च्या वर्गास शासन मान्यता असून इयत्ता 6 वी ते 10 वी च्या वर्गास मान्यता नसताना सदर शाळेतील इयत्ता 6 वी ते 8 वी चे वर्ग अनधिकृत चालू असल्यामुळे सदर अनाधिकृत वर्ग बंद करणे बाबत वेळोवेळी संबंधित शाळा व्यवस्थापनास कळविण्यात आले होते. मात्र अद्यापही इयत्ता इयत्ता 6 वी ते 10 वी चे अनधिकृत वर्ग बंद केल्याचे दिसून येत नाही, असे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे आठवीचे विद्यार्थी दहावीच्या वर्गात जाईपर्यंत म्हणजे दोन वर्षे संबंधित शाळेने शिक्षण विभागाला हुलकावणी दिल्याचे स्पष्ट होत आहे.

अनधिकृत शाळा चालू देणार नाही
रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूल (Renaissance International School) या शाळेत सहावी ते दहावीचे वर्ग विना मान्यता, अनधिकृतपणे चालविले जातात, याबाबतची तक्रार सर्वप्रथम युवा भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून आपण शिक्षण विभागाकडे केली होती. शिक्षण विभागाने उशिराचा होईना शाळेला टाळे लावण्याची कारवाई केली. मात्र शहरात अशा प्रकारच्या अनधिकृत शाळा युवा भीमसेना चालू देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष शेखर कांबळे यांनी दैनिक 'देशोन्नती'शी बोलताना दिला.

Related to this topic: