Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

केरोसिन वितरणातून वगळण्यासाठी हिंगोलीतील स्वस्त धान्य दुकानदारांची शासनाला थेट विनंती

हिंगोली जिल्ह्यातील रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसिन विक्रेते संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे महत्त्वाचे निवेदन सादर केले आहे.


केरोसिन वितरणातून वगळण्यासाठी हिंगोलीतील स्वस्त धान्य दुकानदारांची शासनाला थेट विनंती

Ration Shop Issues |

हिंगोली (Ration Shop Issues) : हिंगोली जिल्ह्यातील रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसिन विक्रेते संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे महत्त्वाचे निवेदन सादर केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून केरोसिन उचल करण्यास जिल्ह्यातील दुकानदार असमर्थ असल्याचे स्पष्ट करत, या जबाबदारीतून अलिप्त ठेवण्याची विनंती संघटनेने केली आहे. 

 12 मे रोजी दिलेल्या या स्मरणपत्रात संघटनेने म्हटले आहे की, शासनाने केरोसिनचा दर 62.90 रुपये प्रति लिटर निश्चित केला असला तरी हा दर इतर तेलांच्या तुलनेत कमी प्रतीचा आहे. मात्र केरोसिन वितरणासाठी लागणारा खर्च आणि गुंतवणूक पाहता मिळणारे मार्जिन अत्यंत तोकडे आहे. केरोसिन साठवणुकीसाठी सुरक्षित लोखंडी टाक्या, मोजमाप यंत्रणा, अग्निसुरक्षेची साधने, वाहतुकीची व्यवस्था आणि साठवणुकीसाठी स्वतंत्र जागा यासाठी मोठ्या भांडवलाची गरज आहे. सध्याच्या कमिशन दरात ही गुंतवणूक परवडणारी नाही. 

याशिवाय गेल्या 4 ते 6 महिन्यांपासून अन्न धान्य वितरणाचे कमिशनच प्रलंबित असल्याने दुकानदार आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत तोट्यात जाणारा केरोसिन वितरणाचा भार उचलणे शक्य नसल्याची भूमिका अनेक दुकानदारांनी मांडली आहे. 

संघटनेच्या म्हणण्यानुसार, केरोसिन वितरण किती दिवस सुरू राहील याची शाश्वती नाही. तसेच पात्र लाभार्थ्यांची स्पष्ट यादी किंवा विशिष्ट वर्ग नसल्याने वितरणाचे नियोजन करणे कठीण होते. कोटा किती मिळेल, मागणी किती असेल याची असमतोल स्थिती असल्याने वितरण पारदर्शक होत नाही. या सर्व कारणांमुळे सदोष आणि अन्यायपूर्ण वाटणाऱ्या या धोरणातून हिंगोली जिल्हा वगळावा, अशी एकमुखी मागणी संघटनेने केली आहे. 

अध्यक्ष भिकुलाल बाहेती, उपाध्यक्ष प्रकाश डुब्बेवार, सचिव अशोक काळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले आहे. शासनाने आता स्थानिक पातळीवरील इतर यंत्रणेमार्फत किंवा स्वतंत्र नियोजन करून केरोसिन वितरण करावे, जेणेकरून दुकानदारांवरील आर्थिक ताण कमी होईल आणि लाभार्थ्यांनाही त्रास होणार नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे. प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन लवकरच तोडगा काढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related to this topic: