Ramadan Eid: हिंगोलीत रमजान ईदच्या उपलक्ष्यात विशेष नमाजांसाठी वाहतुकीत बदल केले गेले आहेत. विविध मार्गांवरील वाहतुकीची व्यवस्था बदलण्यात आली आहे.
हिंगोली (Ramadan Eid) : शहरातील ईदगाह मैदानावर रमजान ईद निमित्त सामुहीक नमाज अदा केली जाते. त्यामुळे ईदगाह समोरील रस्त्यावरील वाहतुक इतर मार्गाने वळविण्या बाबतचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी शुक्रवारी काढले आहेत. हिंगोली शहरात आज २१ मार्च रोजी रमजान ईद निमित्ताने औंढा नागनाथ रस्त्यावरील ईदगाह मैदानावर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज अदा करीत असतात. शहरातील हजारो (Ramadan Eid) मुस्लिम बांधव एकत्र आल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परिणामी रहदारीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखण्याकरीता जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी आज शनिवारी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतुकीच्या बदलाबाबतची अधिसूचना २० मार्चला काढली. त्यामुळे या केलेल्या वाहतुक बदलानुसार वाहन चालकांनी आपली वाहने चालवावीत. कोणीही वाहतुक नियमाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण यांनी केले आहे.
वाहतुकीकरीता बंद असलेले मार्ग, नांदेड नाका, एनटीसी गेट, बसस्थानक पुर्वेकडील प्रवेशव्दार, बावनखोली रस्ता, संभाजी विद्या मंदिर शाळेजवळील रस्ता येथून ईदगाह कडील जाणारी वाहतुक पुर्णपणे बंद ठेवली जाणार. कयाधू नदीकडून नांदेड नाक्याकडे येणारा रस्ता संपूर्णपणे बंद राहणार. जड वाहनास बंद असलेले मार्ग, नर्सी टी पॉईंट,खटकाळी बायपास, अकोला बायपास येथून हिंगोली शहरात येणारे सर्व जड वाहनास प्रवेश बंद राहणार आहे.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग
हिंगोली शहरातून औंढा ना / सेनगावकडे जाण्याकरीता इंदिरा गांधी चौक, महात्मा गांधी चौक, फुलमंडी, गोदावरी कॉर्नर, मेहराजूलूम मस्जिद, खाकी बाबा चौक, कब्रस्तान, कयाधू नदी पुल, नर्सी टी पाँईंट, हिंगोली शहरातून नांदेडकडे जाण्याकरीता इंदिरा चौक, नांदेड नाका, रेल्वेगेट, खटकाळी बायपास, उमरा पाटी, जड वाहतुक वाशिमकडून नांदेडकडे जाण्या करीता अकोला बायपास खटकाळी बायपास मार्गे नांदेड, नर्सी ना. कडून येणारी जड वाहतुक नर्सी टी पॉईंटवरून औैंढ्याकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, नांदेड नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता वाहतुकीस चालू राहणार आहे.