Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

राजनंदिनी घुमनर

राजनंदिनी घुमनर यांचा पार्वती टॉवर येथे सत्कार

Rajnandini Ghumnar: राजनंदिनी घुमणर यांचा पार्वती टॉवर येथे सत्कार संपन्न झाला. त्यांनी पोलीस भरतीत उत्कृष्ट कामगिरी केल्याने नागपूर पोलीस दलात निवड झाली.


राजनंदिनी घुमनर यांचा पार्वती टॉवर येथे सत्कार 

Rajnandini Ghumnar |

हिंगोली () : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील खेड्यातून आलेली राजनंदिनी घुमनर हिने झालेल्या पोलीस भरतीत फिजिकल आणि लेखी परीक्षेत समाधानकारक गुण मिळवीत नागपूर पोलीस दलात निवड झाल्या बद्दल  राजनंदिनी घुमणर हिचा पार्वती टॉवर येथे मंगळवारी ऍड. सुरेश गडदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारामुळे ती भाऊक झाली.

काही दिवसापूर्वी राज्यात ठीक ठिकाणी पोलीस भरती घेण्यात आली. यात हिंगोली येथील राजनंदिनी घुमणर हिने नागपूर येथील पोलीस भरतीत आपली छाप ताकत ग्राउंड मध्ये 50 पैकी 41 तर लेखी परीक्षेत देखील 100 पैकी 95 गुण मिळवीत अव्वल स्थान पटकावले असून तिची नागपूर पोलीस दलात निवड झाली आहे. दरम्यान, (Rajnandini Ghumnar) राजनंदिनी ही मेहनत आणि जिद्द बाळगून आपल्याला पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आई वडिलांच्या कष्टातून हे मोठे यश प्राप्त केल्याने तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पोलीस दलात निवड झाल्याबद्दल राजनंदिनी घुमणर (Rajnandini Ghumnar) हिचा पार्वती टॉवर येथे ऍड. सुरेश गडदे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ऍड. शेख मुदस्सीर , डॉ. मोहनकुमार मुलगीर,  ऍड. विपीन अर्धापुरकर ,गोपाल सातपुते ,ऍड.पवन मस्के, ऍड.किशन वाघमारे, मल्हारराव घुमनर ,कानिफनाथ दिंडे , गुणाराव पोले, देवराव कंठाळे, भगवान गडदे, माऊली गडदे ,सलीम शेख, तौसिफ शेख, ओम राऊत,कृष्णा नरोटे, बाबुराव हराळे, आदींची उपस्थिती होती.

Related to this topic: