Nanded-Kurla Express: नांदेड-कुर्ला या नव्या रेल्वे गाडीचे हिंगोली रेल्वे स्थानकावर प्रथमच आगमन झाले असता, हिंगोलीकरांनी अत्यंत जल्लोषात आणि ऐतिहासिक असे स्वागत, भाजपा नेते खासदार डॉ. रामराव वडकुते
हिंगोली (Nanded-Kurla Express) : नांदेड-कुर्ला या नव्या रेल्वे गाडीचे हिंगोली रेल्वे स्थानकावर प्रथमच आगमन झाले असता, हिंगोलीकरांनी अत्यंत जल्लोषात आणि ऐतिहासिक असे स्वागत केले. भाजपा नेते खासदार डॉ. रामराव वडकुते यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल-ताशांचा गजरात, फटाक्यांची आतिषबाजी करत या रेल्वेचे स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार डॉ.वडकुते यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी रवाना केले.
या नव्या (Nanded-Kurla Express) सुविधेमुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिक, उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी आणि व्यापारी वर्गाला थेट मुंबई (कुर्ला) गाठण्यासाठी एक हक्काचा व सोयीचा मार्ग उपलब्ध झाला आहे. या प्रसंगी बोलताना खासदार डॉ. रामराव वडकुते यांनी, हिंगोलीकरांची ही महत्त्वाची मागणी मान्य केल्याबद्दल देशाचे रेल्वेमंत्री आणि रेल्वे प्रशासनाचे मनापासून आभार मानले. ही नवी रेल्वे सेवा केवळ प्रवासाची सोय नसून, यामुळे हिंगोली जिल्ह्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, माजी जिल्हाध्यक्ष फुलाजीराव शिंदे,युवानेते शशिकांत वडकुते, सुनिताताई मुळे, संजय कावडे, जिल्हा प्रवक्ता विलास गोरे, भाजपा शहराध्यक्ष रजनीश पुरोहीत, बाबाराव घुगे, निखील बांगर, शिवा घुगे, कृष्णा रुहटिया, रजनी पाटील, माणीक लोडे, कैलाश शहाणे, बंडु कर्हाळे, गुड्डू देवकते आदींची उपस्थिती होती. तसेच रेल्वे समितीचे गोवर्धन अण्णा वीरकुंवर, नंदकिशोर तोष्णीवाल, खलील बेलदार, राकेश भट्ट, जेठानंद नेनवाणी, गणेश भैय्या साहु, शेख नौमान यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील रेल्वे समितीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.