Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

एनक्यूएएस नामांकनाच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयास भेट

Govt Medical College: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयास भेट देऊन त्यांनी विविध विभागांची पाहणी केली आणि सुविधा सुधारण्यासाठी सूचना दिल्या.


एनक्यूएएस नामांकनाच्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयास भेट

Govt Medical College |

हिंगोली (Govt Medical College) : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज शुक्रवारी ८ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयातील आरोग्य सुविधा, स्वच्छता, रुग्णसेवा, बाह्यरुग्ण विभाग, मनुष्यबळ उपलब्धता तसेच वैद्यकीय यंत्रणेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा त्यांनी घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एनक्यूएएस नामांकन प्राप्त करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत रुग्णालयातील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व रुग्णकेंद्री करण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रुग्णालयातील स्वच्छता, रुग्ण नोंद व्यवस्थापन, औषध उपलब्धता, प्रसूती कक्ष, आपत्कालीन सेवा, प्रयोगशाळा सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी गुप्ता यांनी विविध विभागांना भेट देत तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधून उपचाराबाबत माहिती घेतली. रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

या (Govt Medical College) भेटीदरम्यान अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, प्र.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक मोरे, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल पवार, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. राजहंस हणमंते, डॉ. नितीन पुरोहित, डॉ. सचिन बोधगिरे, मेट्रन बाळासाहेब चिंचकर, सहाय्यक मेट्रन श्रीमती रागिणी जोशी, श्रीमती आशा क्षीरसागर, सर्व विभाग प्रमुख तसेच अन्य अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.

Related to this topic: