Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ यांची कामगिरी

परभणीत अवघ्या ४८ तासांत बेपत्ता महिलांचा शोध

PSI Santosh Maral: परभणीच्या पाथरी पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोउनि .संतोष मरळ यांनी दाखविलेल्या तत्परता, धाडस आणि कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.


परभणीत अवघ्या ४८ तासांत बेपत्ता महिलांचा शोध

PSI Santosh Maral |

पोलीस उपनिरीक्षक संतोष मरळ यांची कामगिरी; प्रशस्तीपत्र देऊन गौरव

परभणी/ पाथरी (PSI Santosh Maral) : परभणीच्या पाथरी पोलीस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोउनि .संतोष मरळ यांनी दाखविलेल्या तत्परता, धाडस आणि कर्तव्यदक्षतेबद्दल त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

पाथरी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना ऑपरेशन शोध मोहिम - ०३ अंतर्गत त्यांनी  उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. परभणी जिल्ह्यातील गुन्हा नोंद क्रमांक ११०/२०२५ व ४९४ / २०२५ तसेच मिसिंग क्रमांक ०६ /२०२६ मधील पीडित महिलांचा अवघ्या ४८ तासांत शोध घेऊन त्यांना सुरक्षित ताब्यात घेण्यात त्यांनी यश मिळविले आहे. याचबरोबर संबंधित आरोपींनाही पोलिसांसमोर हजर करण्यात आले.

या मोहिमेदरम्यान पोउनि संतोष उत्तमराव मरळ (PSI Santosh Maral) यांनी सुमारे २ हजार किलोमीटरचा प्रवास करून अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत ही कारवाई यशस्वी केली. त्यांच्या कार्यात तांत्रिक कौशल्य, धाडस आणि कर्तव्यनिष्ठा दिसून आली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी तसेच पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले आहे.या यशस्वी कामगिरीमुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असल्याचे म्हणत पोनि . लक्ष्मण केंद्रे यांनी यावेळी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.