Private Travel Arbitrariness: लातूर शहरांमध्ये सायंकाळी सहाच्या नंतरच खाजगी ट्रॅव्हल्सची मोठी गर्दी होत असून मनमानी पद्धतीने कुठेही शहरभर ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत
व्ही. एस. पँथर्स वाहतूक आघाडीचा इशारा
लातूर (Private Travel Arbitrariness) : लातूर शहरांमध्ये सायंकाळी सहाच्या नंतरच खाजगी ट्रॅव्हल्सची मोठी गर्दी होत असून मनमानी पद्धतीने कुठेही शहरभर ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीला तात्काळ चाप लावा, अन्यथा व्ही.एस. पँथर्स तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेने दिला आहे.
व्ही. एस. पँथर्स युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनोदभाऊ खटके यांच्या सूचनेनुसार वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष शाहरुख मणियार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. लातूर शहरातील खाजगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीला चाप लावण्याची मागणी करण्यात आली. खाजगी ट्रॅव्हल्स वाले उन्हाळी आणि दिवाळी सुट्ट्यांमध्ये सामान्य नागरिकाकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारत आहेत. तसेच संध्याकाळी सहा वाजल्यापासून शहरात खाजगी ट्रॅव्हल्स येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूकदारांना अडचण होत आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर गाड्या उभ्या करून वाहतूक कोंडी करत आहेत. यांच्यावर योग्य ती कारवाई करावी; अन्यथा व्ही.एस. पँथर्स तीव्र आंदोलन छेडेल, याची गंभीरतेने दखल घेण्यात यावी, असा इशारा यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष शरद किनीकर, वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष शाहरुख मणियार, शहर सचिव आयान पठाण, अन्वर शेख, मोहम्मद शेख, आसिफ शेख, युनियनचे गणेश कसबे, रिहान सय्यद, जुबेर सय्यद, अजहर शेख, शादुल शेख, राजू मस्के, अर्जुन कराड आदींच्या स्वाक्षरी आहेत.