Primary Health Center Ambulance: महिलांना रुग्णवाहिकेच्या दाखलास नकार दिल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्ण रेफर करण्याच्या प्रवृत्तीमुळे आरोग्य कर्मचारी एकच शिपाई नेमवण्याची मागणी होत आहे.
प्रसूतीसाठी आली होती महिला
नेहमीच होतो जबाबदारी झटकण्याचा प्रकार
जवळा बाजार (Primary Health Center Ambulance) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जबाबदारी झटकणारे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्यामुळे कोणताही रुग्ण आला की रेफर करण्याचे काम सुरू असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी ऐवजी रेफर करण्यासाठी एकच शिपाई नेमण्याची उपरोधिक मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे.
महामार्गावर गाव असल्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. मात्र रुग्ण रेफर करण्याच्या प्रवृत्तीमुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याला शिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रति नियुक्ती वर पाठवण्यात आले. या आधी सुद्धा एका अपघाताच्या प्रकरणात खाजगी रुग्णवाहिकेमधील जखमी तरुणाला आरोग्य केंद्रामध्ये दाखल करून घेण्यास वैद्यकीय अधिकारी व पारिचारिकेने नकार दिला होता.
मालेगाव येथील माहेरवाशीण मनीषा ओमप्रकाश इंगळे यांना प्रसूती वेदना होत असल्यामुळे त्यांच्या आप्तस्वकीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकेसाठी दूरध्वनी केला असता आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेच्या चालकाने डिझेल नसल्याचे कारण सांगितले व रुग्ण आणण्यास नकार दिला. त्यानंतर सदर महिलेस खाजगी रुग्णवाहिकेने जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्यात आले. यानंतर प्रकरण अंगाशी शेकण्याची चिन्हे दिसू लागताच रुग्णवाहिकेच्या चालकाने 3000 रुपयांचे डिझेल रुग्णवाहिकेमध्ये भरले. सदर पेट्रोल पंपावर आरोग्य विभागाचा डिझेल भरण्याचा करार असताना रुग्ण रेफर करण्याच्या प्रवृत्तीमुळे रुग्णवाहिकेमध्ये डिझेल भरण्यास टाळाटाळ केली जाते.