Dr. Pragya Satav: केंद्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीसाठी उच्चस्तरीय समिती तयार केली, ज्यात आ.डॉ.प्रज्ञाताई सातव यांना सदस्य म्हणून निवडले गेले आहे.
Dr. Pragya Satav |
हिंगोली (Dr. Pragya Satav) : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आगामी २०० वी जयंती २०२६ ते २०२८ पर्यंत राष्ट्रव्यापी स्तरावर साजरी करण्यासाठी केंद्र सरकारद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशपातळीवर १२६ सदस्यांची एक उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित समितीत सदस्य म्हणून आ.डॉ. प्रज्ञाताई सातव (Dr. Pragya Satav) निवड करण्यात आली.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा घराघरात पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांची रूपरेषा ठरवण्यासाठी तसेच दोन वर्षांच्या या स्मरणोत्सवांतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे संचलन आणि अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे व शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समता या विषयांवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमाची आखाणी हि समिती करणार असून, या समितीत माजी राष्ट्रपती, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि देशातील सर्वोच्च धोरणकर्ते, पद्मश्री पुरस्कारार्थी, विविध तज्ज्ञ व प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे.
फुले दाम्पत्याचा समतेचा विचार देशाला अधिक समृद्ध करण्यासाठी या माध्यमातून कटिबद्ध राहणार असल्याचे आ. डॉ. प्रज्ञाताई सातव (Dr. Pragya Satav) यांनी सांगितले व या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार त्यांनी मानले.