Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

सपोनि प्रेमलता जगताप गोमासे

घाबरून न जाता महिलांनी धीट होऊन लढा

API Premlata Jagtap Gomase: पोलिस निरिक्सक प्रेमलता जगताप गोमासे यांनी घाबरून न जाण्यासाठी महिलांना सावधगिरी करावी, स्वतः सुरक्षित ठेवण्याचे कायदेशीर राहिले पाहिजे.


घाबरून न जाता महिलांनी धीट होऊन लढा 

API Premlata Jagtap Gomase |

 

'भरोसा सेल'च्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप गोमासे यांनी महिलांना दिला कानमंत्र

हिंगोली (API Premlata Jagtap Gomase) : "महिलांनी घाबरण्यापेक्षा सतर्क राहून धीटपणे परिस्थितीला सामोरे जावे," असा कानमंत्र पोलीस मुख्यालय भरोसा सेलच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप (गोमासे) यांनी दिला आहे. महिलांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करताना त्यांनी 8 महत्त्वाचे सुरक्षा नियम सांगितले.

भरोसा सेलच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमलता जगताप (गोमासे) (API Premlata Jagtap Gomase) म्हणाल्या की, महिलांनी घरी आल्यावर सर्वात आधी दरवाजा लॉक करावा. सार्वजनिक ठिकाणी वावरताना बाहेर पडण्याचा मार्ग कायम लक्षात ठेवावा. स्वतःच्या गाडीत बसण्यापूर्वी गाडीच्या आत व आजूबाजूच्या परिसराची खात्री करून घ्यावी. आपल्या आसपास कोण आहे याकडे सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

"काहीही संशयास्पद वाटल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. अनोळखी व्यक्तीला आपले अचूक लोकेशन कधीही सांगू नका. रोजचा ये-जा करण्याचा मार्ग आणि वेळ अधूनमधून बदलल्यास धोका कमी होतो," असे त्या म्हणाल्या. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ प्रतिकार करता यावा म्हणून एक हात नेहमी मोकळा ठेवावा, हा नियम प्रत्येक महिलेने पाळावा, असे आवाहन त्यांनी केले. 

"छोट्या-छोट्या सवयी मोठे धोके टाळतात. घाबरून न जाता धीट होऊन स्वतःचे संरक्षण करा. कोणत्याही अडचणीच्या वेळी भरोसा सेल 24 तास महिलांच्या मदतीसाठी तयार आहे," असे स.पो.नि. प्रेमलता जगताप (गोमासे) यांनी स्पष्ट केले. महिला हेल्पलाईन 1091 किंवा आपत्कालीन क्रमांक 112 वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.