Police Constable Death: भरधाव वेगातील हायवाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस शिपायाचा रुग्णालयात मृत्यू झाला.
पूर्णा येथील ताडकळस टि- पॉईंट वळणावरील घटना हायवा चालकावर गुन्हा...!
परभणी (Police Constable Death) : भरधाव वेगातील हायवाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस शिपायाचा रुग्णालयात मृत्यू झाला. सदर प्रकरणी मंगळवार २ जून रोजी हायवा चालका विरोधात पूर्णा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवराम मन्मथ आष्टुरकर, असे मयत पोलीस शिपायाचे नाव आहे. परभणी पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले शिवराम १ जून रोजी सुट्टी घेऊन परभणीहून नांदेडला घरी येत होते. पूर्णा येथील ताडकळस टि- पॉईंटवर सायंकाळी साडे सहाच्या सुमारास एका हायवाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून शिवराम आष्टुरकर यांना (Police Constable Death) मयत घोषीत केले. सदर प्रकरणी मयताचे भाऊ गजानन आष्टुरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एम.एच. २६ सी.एच. ३६७३ या क्रमांकाच्या हायवा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्णा पोलीस अधिक तपास करत आहेत.