Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

तीर्थक्षेत्र पोहरादेवी

तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील विकास कामांचा मार्ग मोकळा; मंत्री संजय राठोड यांच्याकडून ग्वाही

Pohra Devi Pilgrimage: महाराष्ट्राच्या मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीतील बांधकामांमध्ये असलेल्या तक्रारांना समाधान देण्यात आले. संत सेवालाल महाराज मंदिर आणि देवी जगदंबा माता मंदिर


तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील विकास कामांचा मार्ग मोकळा मंत्री संजय राठोड यांच्याकडून ग्वाही

Pohra Devi Pilgrimage |

मानोरा (Pohra Devi Pilgrimage) : बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील रखडलेल्या विकास कामांना आता नव्याने गती मिळणार आहे.  दिनांक २७ मे २०२६ रोजी, मुंबईतील मंत्रालय येथे महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड (Sanjay Rathore) यांची पोहरादेवी संस्थानच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत पोहरादेवी येथील थांबलेल्या विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

संत सेवालाल महाराज मंदिर आणि देवी जगदंबा माता मंदिर (Pohra Devi Pilgrimage) यांच्या बांधकामात काही तांत्रिक व इतर अडचणी येत होत्या. या अडचणींमुळे विकास कामांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली आणि सकारात्मक तोडगा काढत अखेर या कामांमधील अडथळा दूर करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या चर्चेप्रसंगी बैठकीला देवी व सेवालाल महाराज संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महंत कबीरदास महाराज, महंत रायसिंग महाराज, ॲड ज्ञायक  पाटणी आणि विजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. या यशस्वी चर्चेमुळे पोहरादेवी परिसरातील भाविक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, रखडलेली कामे लवकरच पूर्णत्वास जातील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

तीर्थक्षेत्र पोहरादेवी (Pohra Devi Pilgrimage) येथील मंदीर बांधकाम विकास कामाचे सर्व अडथळे आता दूर झाले असुन थांबलेली विकास कामे आता नव्या जोमाने व वेगाने सुरू होणार आहेत.
- संजय राठोड, मृद व जलसंधारण मंत्री, महाराष्ट्र राज्य