नसरापूर गावातील चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्याकांडानंतर लगेचच पुण्यात दुसरी धक्कादायक घटना घडली आहे.
पुणे (Pimpri Chinchwad Incident) : नसरापूर गावातील चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार आणि हत्याकांडानंतर लगेचच पुण्यात दुसरी धक्कादायक घटना घडली आहे. महाळुंगे (पिंपरी-चिंचवड) येथे एका तीन वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची गळा चिरून हत्या केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा अल्पवयीन असून त्याचे वय १६ आहे. तो बिहार राज्यातील रहिवासी आहे. त्याने ज्या अल्पवयीन मुलाला आपल्या वासनेचा शिकार बनवलं तो तो मध्य प्रदेशातील आहे.
या अमानुष घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच महाळुंगे दक्षिण पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.