Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

Pilgrim Security

वारकऱ्यांसोबत पावलो पावली; पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी स्वतः चालत सांभाळली दिंडीची सुरक्षा

हिंगोली तालुक्यातील डिग्रस कर्‍हाळे येथून शेगावकडे जाणारी दिंडी ३ जुलै रोजी पुढील मार्गासाठी मार्गस्थ झाली.


वारकऱ्यांसोबत पावलो पावली पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी स्वतः चालत सांभाळली दिंडीची सुरक्षा

Pilgrim Security |

हिंगोली (Pilgrim Security) : हिंगोली तालुक्यातील डिग्रस कर्‍हाळे येथून शेगावकडे जाणारी दिंडी ३ जुलै रोजी पुढील मार्गासाठी मार्गस्थ झाली. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या या दिंडीच्या सुरक्षेची जबाबदारी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी स्वतः खांद्यावर घेतली.

पावसाळी वातावरणात शेकडो वारकऱ्यांचा ताफा रस्त्याने मार्गक्रमण करत असताना पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी दिंडीसोबत चालत चोख बंदोबस्त ठेवला. केवळ बंदोबस्तावरच न थांबता त्यांनी वारकऱ्यांसमवेत चालत वाहतूक व्यवस्थेवरही बारकाईने लक्ष ठेवले. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना शिस्त लावत दिंडीचा मार्ग मोकळा करण्याचे काम त्यांनी स्वतः केले.

पांढऱ्या वस्त्रातील वारकरी आणि हातात भगवे ध्वज घेऊन चालणाऱ्या दिंडीसोबत खाकी वर्दीतील पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे चालत असल्याचे दृश्य उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. कायदा व सुव्यवस्था राखतानाच वारकऱ्यांच्या सेवेतही पोलीस सहभागी झाल्याने दिंडीतील भाविकांनी समाधान व्यक्त केले.

डिग्रस कर्‍हाळे येथून निघालेली ही शेगावची दिंडी पुढील मुक्कामासाठी रवाना झाली असून, संपूर्ण मार्गावर पोलीस प्रशासनाकडून कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

Related to this topic: