Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > पुणे

पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या; मार्गदर्शकावर विनयभंगाचा आरोप, आरोपी अटकेत

पुण्यातील चिंचवड परिसरात एका 30 वर्षीय पीएचडी विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या मार्गदर्शकावर विनयभंगाचा आरोप आरोपी अटकेत

PhD Student Case |

पिंपरी (PhD Student Case) : पुण्यातील चिंचवड परिसरात एका 30 वर्षीय पीएचडी विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये संशोधन करणाऱ्या या विद्यार्थिनीने आपल्या मार्गदर्शकाकडून होत असलेल्या कथित गैरवर्तनामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

शाहूनगरमध्ये घडली घटना

ही घटना चिंचवडमधील शाहूनगर येथे घडली. संबंधित विद्यार्थिनीने शनिवारी (11 एप्रिल) आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

 मार्गदर्शकावर गंभीर आरोप

या प्रकरणी मृत विद्यार्थिनीच्या वडिलांनी भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार, बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियामध्ये कार्यरत असलेले सहायक संचालक डॉ. ए. बिन्नियमिन (वय 50, रा. धानोरी) यांच्यावर विनयभंग व मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

 सुसाईड नोटमधून धक्कादायक खुलासा

आत्महत्येपूर्वी विद्यार्थिनीने लिहिलेल्या चिठ्ठीत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट 2025 पासून संबंधित मार्गदर्शक तिच्याशी गैरवर्तन करत होता आणि सतत मानसिक त्रास देत होता, असा उल्लेख तिने केला आहे. या छळाला कंटाळूनच तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे.

‘चूक झाली’ असे लेखी आश्वासनही निष्फळ

घटनेपूर्वी दोन दिवस आधी आरोपीने स्टॅम्प पेपरवर पुन्हा असा प्रकार करणार नसल्याचे लिखित आश्वासन दिल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, या घटनेमुळे झालेल्या मानसिक ताणातून विद्यार्थिनी बाहेर पडू शकली नाही.

आरोपी पोलीस कोठडीत; तपास सुरू

अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शैक्षणिक क्षेत्रात घडलेली ही घटना अत्यंत गंभीर असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

Related to this topic: