Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

औषध दुकान बंद

कळमेश्वर तालुक्यात औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद

Drug store closed: कळमेश्वर तालुक्यात औषध विक्रेत्यांनी अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या आवाहनावर प्रतिसाद देत कडक बंद पाळला.


कळमेश्वर तालुक्यात औषध विक्रेत्यांचा कडकडीत बंद

Drug store closed |

 

काही रुग्णालयांतून गुपचूप औषध वितरण सुरू असल्याची चर्चा 

कळमेश्वर (Drug store closed) : अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेच्या देशव्यापी बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत कळमेश्वर शहरासह संपूर्ण तालुक्यात किरकोळ औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. मात्र सुरुवातीला काही वेळ शहरातील हर्ड फार्मसी तसेच मेड प्लस फार्मसी सुरू असल्याचे दिसून आले  शहरातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद असल्याने बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले.

ऑनलाइन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांची वाढती स्पर्धा तसेच औषध व्यवसायासमोरील विविध समस्यांविरोधात हा बंद पुकारण्यात आला होता. बंदमुळे अनेक ठिकाणी औषध खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र अत्यावश्यक सेवा लक्षात घेता काही ठिकाणी आपत्कालीन स्वरूपात रुग्णांना सेवा देण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

दरम्यान, काही खासगी रुग्णालयांच्या आतून रुग्णांना औषधे उपलब्ध करून दिली जात असल्याची खात्रीलायक माहिती काही रुग्णांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. बाहेरील मेडिकल दुकाने बंद (Drug store closed) असताना काही हॉस्पिटलमधून औषध वितरण सुरू असल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. यामुळे बंदच्या नियमांचे समान पालन झाले का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

काही नागरिकांनी प्रशासनाने या प्रकाराची चौकशी करून स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे औषध विक्रेता संघटनांनी बंद पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा करत सरकारने ऑनलाइन औषध विक्रीसंदर्भात कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे.