Patur Heatwave: पातूर शहरात वाढत्या उन्हाच्या तापमानाने जनजीवन विस्कळीत केले आहे. मुख्य रस्ते आणि बाजारपेठा दुपारी ओस पडतात. वाढत्या उष्णतेमुळे वृद्ध आणि लहान मुलांवर विपरीत परिणाम झाला आहे.
पातूर (Patur Heatwave) : गेल्या काही दिवसांपासून पातूर शहरात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून वाढत्या तापमानामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. दुपारी १२ वाजल्यापासूनच उन्हाच्या झळा इतक्या तीव्र होतात की, शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. (Patur Heatwave) कडक उन्हामुळे पातूर शहर दुपारी जणू 'कर्फ्यू' लागल्यासारखे सामसूम होत आहे.
या (Patur Heatwave) वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना बसत आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे वृद्धांना श्वास घेण्यास त्रास होणे, अशक्तपणा जाणवणे यांसारख्या समस्या भेडसावत आहेत, तर लहान मुलेही उकाड्याने व्याकुळ झाली आहेत. उन्हाची तीव्रता पाहता नागरिक आरोग्याची काळजी म्हणून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत आहेत. दुसरीकडे, पोटाची खळगी भरण्यासाठी भर उन्हात काम करणाऱ्या हातगाडी चालकांचे आणि छोट्या व्यापाऱ्यांचे हाल बेहाल झाले आहेत.
दुपारी रस्ते ओस पडत असल्याने हातगाडीवर माल विकणाऱ्यांची विक्री निम्म्यावर आली आहे. डोक्यावर तळपणारे ऊन आणि रस्त्यावरील शांतता यामुळे दिवसभर उभे राहूनही अपेक्षित कमाई होत नसल्याने या कष्टकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. (Patur Heatwave) उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक छत्री, रुमाल आणि शीतपेयांचा आधार घेत असून, पावसाळ्यापर्यंत ही उष्णता अशीच कायम राहण्याची शक्यता असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.