Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त 'स्वाभिमानी दिन' साजरा

Prakash Ambedkar: पातूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिन म्हणून साजरा करण्यात आला. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


प्रकाश आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमानी दिन साजरा

Prakash Ambedkar |

 

प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

पातूर (Prakash Ambedkar) : वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते तथा प्रखर लोकनेते श्रद्धेय बाळासाहेब ऊर्फ ॲड. प्रकाशजी आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा वाढदिवस 'स्वाभिमानी दिन' म्हणून पातूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोठ्या उत्साहात आणि सेवाभावी उपक्रमाने साजरा करण्यात आला. "जननायकाचा वाढदिवस, जनसेवेचा संकल्प" हे ब्रीद समोर ठेवून दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

धार्मिक सलोखा आणि अभिवादन
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्थानिक काशी कवळेश्वर मंदिर येथे दुग्धाभिषेक करून करण्यात आली. यावेळी बाळासाहेबांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर बुद्धभूमी शिरला विहार येथे सामूहिक बुद्ध वंदनेचा कार्यक्रम पार पडला. या दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या नेत्याप्रती आदर व्यक्त केला.

महापुरुषांना अभिवादन व जल्लोष
शहरातील संभाजी चौक येथील महात्मा फुले स्मारकाजवळ सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत केक कापून वाढदिवसाचा जल्लोष साजरा केला. यावेळी 'वंचित बहुजन आघाडीचा विजय असो', 'बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

सामाजिक बांधिलकी: धान्य वाटप
केवळ जल्लोष न करता सामाजिक भान जपण्यावरही भर देण्यात आला. (Prakash Ambedkar) वाढदिवसाचे औचित्य साधून शहरातील गरजू व वंचित घटकांतील कुटुंबांना *धान्य वाटप* करण्यात आले. संकटाच्या काळात वंचितांच्या पाठीशी उभे राहणे हीच बाळासाहेबांना खरी शुभेच्छा ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

यावेळी  तालुकाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ महासचिव शरद सुरवाडे संघटक राजू बोरकर प्रसिद्ध प्रमुख दिनेश गवई विनोद देशमुख मा जि प सदस्य  अर्जुन टप्पे राजेश देशमुख राजेश महल्ले संजय पाचपोर अनिल राठोड राजेश तायडे मंगलाताई इंगळे रितेश फुलारी मोहन गाडगे योगेश इंगळे शीलवंत उपरवट अक्षय उपरवट लावण्य अतकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते

Related to this topic: