Rani Ingale: पातूरच्या तुळसाबाई कावल विद्यालयातील राणी अलका ज्ञानेश्वर इंगळे हिने बारावी आणि बी.टेक पूर्ण केल्यानंतर एमबीएसाठी निवड मिळवून विद्यालयाच्या शिरपेच्यात एक नवा मानाचा तुरा
राणी इंगळे हिची भारतीय प्रबंध संस्थान, इंदोर येथे निवड
पातूर (Rani Ingale) : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातूर येथील द्विलक्षी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी राणी अलका ज्ञानेश्वर इंगळे (Rani Ingale) हिची भारतीय प्रबंध संस्थान, इंदोर येथे एमबीए अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राणीने बारावी (वर्ष 2022) मध्ये कम्प्युटर सायन्स शाखेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर बी.टेक पदवी संपादन केली. लहानपणापासूनच अभ्यासाची आवड, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर तिने सातत्याने मेहनत घेतली आणि आज त्या कष्टांचे फळ तिला मिळाले आहे.
नांदखेड या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील राणी ही भारतीय प्रबंध संस्थान, इंदोर येथे एमबीए करण्यासाठी निवड होणारी गावातील पहिली मुलगी ठरली आहे. “प्रामाणिक प्रयत्नांनीच स्वप्ने साकार होतात” या विश्वासावर तिने वाटचाल करत यश संपादन केले.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बेरार एज्युकेशन सोसायटी, पातूरचे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, सचिव स्नेह प्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर. एस. ढेंगे, पर्यवेक्षिका पी. एम. कारस्कर, पर्यवेक्षक एस. आर. मोखाडे, वर्गशिक्षक प्रा. विपिन सिंह गहलोत, संगणक प्रा. व्ही. आर. शर्मा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. राणी इंगळे (Rani Ingale) हिने आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य तसेच आई-वडिलांना दिले आहे.