Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

निकृष्ट बियाणे प्रकरण

निकृष्ट बियाणे प्रकरणी दोन कंपन्यांविरुद्ध पातूर पोलिसांत गुन्हे दाखल

Substandard Seeds Case: पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बियाण्याच्या उगवण न झाल्याबद्दल काढली गेलेली तक्रारांवर मध्य प्रदेशातील दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हेदाखल करण्याची पोलिस कारवाई


निकृष्ट बियाणे प्रकरणी दोन कंपन्यांविरुद्ध पातूर पोलिसांत गुन्हे दाखल

Substandard Seeds Case |

महाबीज प्रयोगशाळेच्या अहवालानंतर कारवाई; शेतकऱ्यांच्या तक्रारींना न्याय

पातूर (Substandard Seeds Case) : पातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याच्या तक्रारींनंतर दोन वेगवेगळ्या बियाणे कंपन्यांविरुद्ध पातूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाबीज बियाणे विश्लेषण प्रयोगशाळा, अकोला येथून प्राप्त झालेल्या अहवालात संबंधित बियाणे अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पहिल्या प्रकरणात (अप. क्र. 352/2026) तालुका कृषी अधिकारी महादेव श्रीराम राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदूर (मध्य प्रदेश) येथील ऑस्कर सिड्स प्रा. लि. या कंपनीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955, बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968 तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 ते 14 जुलै 2026 या कालावधीत शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

दुसऱ्या प्रकरणात (अप. क्र. 353/2026) पंचायत समिती पातूर येथील बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी जयंत सहदेव सोनोने यांच्या फिर्यादीवरून मध्य प्रदेशातील ओस्वाल सिड्स अँड केमिकल्स लि. या कंपनीविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम, बियाणे कायदा, बियाणे नियम तसेच बीएनएस कलम 318(4) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 28 जून ते 3 जुलै 2026 दरम्यान प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या आधारे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित कंपन्यांच्या बियाण्यांची पेरणी करूनही उगवण न झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार होती. महाबीज बियाणे विश्लेषण प्रयोगशाळेच्या अहवालात बियाणे अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कृषी विभागाने पोलिसांकडे कायदेशीर तक्रार दाखल केली. त्यानुसार पातूर पोलिसांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Related to this topic: