Breaking News
  • केवळ चाकणकरांवर कारवाई का? खऱ्या सूत्रधारांना का वाचवताय? – नाना पटोलेंचा रोकठोक सवाल
  • राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते हेल्मेट न घालता चार्जिंग स्कूटीवरून कलेक्टर ऑफिसला पोहचले
  • पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत
  • सोलापूर - अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
  • सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
  • फडणवीसांचा दुचाकी प्रवासाने वेधले लक्ष; शेलार-परब संवादावर मिश्किल व्हिडिओ व्हायरल
  • देवास येथील एका कारखान्यात जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा
  • मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा

ग्रामपंचायत निधी माहितीप्रकरणी टाळाटाळ

पातूर पंचायत समितीच्या निधीबाबत माहिती देण्यास टाळाटाळ

पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये विकास निधीबाबत माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. याविरोधात विजयकुमार ताले यांनी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन केले.


पातूर पंचायत समितीच्या निधीबाबत माहिती देण्यास टाळाटाळ


ग्रामपंचायत निधी माहितीप्रकरणी टाळाटाळ; कार्यकर्त्याचा संताप अनावर
पातूर : पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गोंधळवाडी, तांदळी बु. आणि देऊळगाव या तीन ग्रामपंचायतींच्या १४ वा व १५ वा वित्त आयोगाच्या निधीबाबत माहिती देण्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याच्या निषेधार्थ सायवणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार ताले यांनी आज अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तीन ग्रामपंचायतींच्या निधीच्या तपशीलासाठी विजयकुमार ताले यांनी पंचायत समितीकडे अनेकदा अर्ज केले होते. मात्र, मागितलेली माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याने संतप्त झालेल्या ताले यांनी थेट ४ मे रोजी पंचायत समिती गाठली. गटविकास अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन त्यांनी अर्धनग्न होऊन आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे पंचायत समिती परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, गटविकास अधिकारी अनुपस्थित असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मध्यस्थी केली. प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्यात आला असता, त्यांनी ५ मे रोजी संबंधित प्रकरण मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विजयकुमार ताले यांनी आंदोलन स्थगित केले.
बॉक्स : निधीचा दुरुपयोग थांबता थांबेना!
पातूर पंचायत समिती अंतर्गत अनेक गावांमध्ये विकासकामे केवळ कागदोपत्री दाखवून शासनाच्या निधीचा दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून अशा प्रकरणांवर ठोस कारवाई होत नसल्याने गैरप्रकारांना जणू अभय मिळत असल्याचे चित्र आहे. परिणामी, निधीचा दुरुपयोग थांबण्याची चिन्हे अद्याप दिसून येत नाहीत.

Related to this topic: