Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ

पातूर अधिकाऱ्यांची बदली

पातूर पं. स.च्या गटविकास अधिकाऱ्यांची बदली

Patur Panchayat Samiti: पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश नायसे यांची बदली झाली. पेव्हर ब्लॉक कामांमध्ये अनियमितता व निकृष्ट दर्जाबाबत तक्रारींमुळे ही कारवाई झाल्याचे समजते.


पातूर पं सच्या गटविकास अधिकाऱ्यांची बदली

Patur Panchayat Samiti |

पेव्हर ब्लॉक प्रकरणाची पार्श्वभूमी ची चर्चा 

पातूर (Patur Panchayat Samiti) : पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश नायसे यांची बदली करण्यात आल्याचे आदेश २ एप्रिल रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जारी केले. त्यांच्या जागी मूर्तीजापूर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुभाष काळे यांच्याकडे प्रभारी पदभार सोपविण्यात आला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात पेव्हर ब्लॉक कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी, दोन सचिवांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याची चर्चा, तसेच बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी दिग्रस बु. येथे घेतलेल्या आमसभेत गटविकास अधिकाऱ्यांची अनुपस्थिती आदी कारणांमुळे ही बदली झाल्याचे सांगितले जात आहे.

पातूर तालुक्यात (Patur Panchayat Samiti) पेव्हर ब्लॉक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गोडबंगाल होऊन शासनाला कोट्यवधींचा आर्थिक फटका बसल्याची चर्चा सुरू आहे. तसेच काही सचिवांना अभय दिले जात असल्याच्या आरोपांमुळेही वातावरण तापले होते. याच पार्श्वभूमीवर गटविकास अधिकाऱ्यांची बदली करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पेव्हर ब्लॉक कामांवरून झालेल्या वादातून पंचायत समिती कार्यालयात हाणामारी झाल्याची घटना देखील घडली होती, ज्यामुळे हा विषय अधिकच गंभीर बनला आहे.

पेव्हर ब्लॉक कामांची चौकशी सुरू चर्चा 

३० मार्च रोजी पेव्हर ब्लॉक कामांतील निकृष्ट दर्जाबाबत वाद निर्माण होऊन पंचायत समिती कार्यालयात हाणामारीची घटना घडली होती. या प्रकरणाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित कामांची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.अशी चर्चा आहे

 

 

Related to this topic: