Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला; २० जून रोजी मतदान, तर २१ जूनला मतमोजणी!

राज्य निवडणूक आयोगाने अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या संपूर्ण सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम आज जाहीर केला आहे.


पातूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजला २० जून रोजी मतदान तर २१ जूनला मतमोजणी

Patur Municipal Election 2026 |

पातूर (Patur Municipal Election 2026) : राज्य निवडणूक आयोगाने अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या संपूर्ण सार्वत्रिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम आज जाहीर केला आहे. पातूर नगरपरिषदेची प्रभाग रचना विहित वेळेत पूर्ण न झाल्याने यापूर्वी निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या, मात्र आता आयोगाने नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

निवडणुकीचे स्वरूप : 

पातूर नगरपरिषदेमध्ये एकूण १ नगराध्यक्ष पद आणि २० सदस्य पदांसाठी ही निवडणूक पार पडणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून केली जाणार असून त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.

निवडणूक वेळापत्रक खालीलप्रमाणे:

  • जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक नोटीस प्रसिद्ध करणे: १२ मे २०२६
  • नामनिर्देशनपत्रे भरण्याचा कालावधी: १८ मे ते २५ मे २०२६ (सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत)
  • नामनिर्देशनपत्रांची छाननी: २६ मे २०२६
  • अर्ज मागे घेण्याची मुदत (अपील नसल्यास): २ जून २०२६ पर्यंत
  • मतदानाचा दिनांक: २० जून २०२६ (सकाळी ७:३० ते संध्याकाळी ५:३०)
  • मतमोजणी व निकाल: २१ जून २०२६
  • राजपत्रात निकाल प्रसिद्ध करणे: २३ जून २०२६

आचारसंहिता लागू:

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून पातूर नगरपरिषद संपूर्ण क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. मंत्री, खासदार किंवा आमदारांना मतदारांवर प्रभाव पाडणारी कोणतीही घोषणा किंवा प्रलोभन देता येणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

महत्त्वाची टीप:

राखीव जागेवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे अर्ज केल्याचा पुरावा देणे बंधनकारक असून, निवडून आल्यापासून ६ महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र द्यावे लागेल.

पातूरसह अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेच्या एका रिक्त जागेसाठी देखील याच वेळापत्रकानुसार निवडणूक पार पडणार आहे.