Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

पातूर नगर परिषद

केंद्र प्रमुख नियुक्तीवर आक्षेप; पदभार काढण्याची मागणी

Patur Municipal Council: पातूरमधील केंद्र प्रमुख पदाची नियुक्ति नियमनिवारू असल्याचे आरोप करून गटशिक्षणाधिकार्यांनी तात्काळ पदभार वापरून टाकाव्याची मागणी केली.


केंद्र प्रमुख नियुक्तीवर आक्षेप पदभार काढण्याची मागणी

Patur Municipal Council |

पातूर (Patur Municipal Council) : पातूर नगर परिषदेच्या केंद्र प्रमुख पदाच्या नियुक्तीवर आक्षेप घेत संबंधित अधिकाऱ्यांचा पदभार तातडीने काढून टाकावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.

इम्रान खान रऊफ खान (रा. पातूर) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, नगर परिषद पातूरचे प्रभारी केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या सय्यद माजिद हुसेन यांची नियुक्ती नियमानुसार झालेली नसून ती ज्येष्ठतेच्या नियमांना डावलून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, केंद्र प्रमुखाची नियुक्ती जिल्हा परिषद शाळेतील व ज्येष्ठतेनुसार पात्र शिक्षकांमधून होणे अपेक्षित असताना संबंधित अधिकारी एका शैक्षणिक शाळेत कार्यरत असून त्यांच्याकडे केंद्र प्रमुख पदाचा कार्यभार देण्यात आला आहे. ही नियुक्ती नियमबाह्य असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांचा केंद्र प्रमुख पदाचा कार्यभार तात्काळ काढून टाकावा, अशी मागणी अर्जातून करण्यात आली आहे.

या तक्रारीच्या प्रती शिक्षणमंत्री, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), विभागीय शिक्षण उपसंचालक अमरावती, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद अकोला, शालेय शिक्षण मंडळ अमरावती, अल्पसंख्याक आयोग तसेच गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती पातूर यांना पाठविण्यात आल्या आहेत.

दरम्यान नविन केन्द्र प्रमुख याचे नावे आले असुन लवकरच नविन केन्द्र प्रमुख नेमणूक करण्यात येईल न. प. क्षेत्रात येत असलेल्या शाळावर केन्द्र प्रमुख नेमणूक करण्यासाठी मुख्ययाधिकिरी याना पत्र दिले आहे त्याचे कडुन नाव आल्यावर त्याची नियुक्ती करण्यात येईल.
-डाबेराव, गटशिक्षणाधिकारी प. स. पातूर

Related to this topic: