Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

नागपूर च्या लकडगंजमध्ये पार्किंगच्या वादातून रक्तरंजित हल्ला; शेजाऱ्यावर कटरने वार

उपराजधानीतील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्किंगच्या किरकोळ वादातून शेजाऱ्याने धारदार कटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


नागपूर च्या लकडगंजमध्ये पार्किंगच्या वादातून रक्तरंजित हल्ला शेजाऱ्यावर कटरने वार

Parking Dispute Violence |

नागपूर : पार्किंगच्या वादातून शेजाऱ्यावर कटरने हल्ला; आरोपी अटकेत

नागपूर (Parking Dispute Violence) : उपराजधानीतील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्किंगच्या किरकोळ वादातून शेजाऱ्याने धारदार कटरने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भूषण कळसकर हे जखमी झाले असून, पोलिसांनी आरोपी संतोष रणचुरे याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लकडगंज परिसरात राहणारे भूषण कळसकर आणि संतोष रणचुरे हे एकमेकांचे शेजारी आहेत. भूषण आणि त्यांची पत्नी रुग्णालयात नोकरी करतात, तर संतोष रणचुरे भंगार व्यवसाय करतो. घराजवळ वाहन उभे करण्याच्या कारणावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता.

२० एप्रिल रोजी या वादाने पुन्हा उग्र रूप धारण केले. शाब्दिक चकमकीनंतर हा वाद हाणामारीत परिवर्तित झाला. संतापाच्या भरात संतोष रणचुरे याने धारदार कटरने भूषण कळसकर यांच्यावर वार केले. या हल्ल्यात भूषण यांच्या हाताला व पायाला गंभीर दुखापत झाली.

जखमी भूषण कळसकर यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related to this topic: