Parbhani molestation case: परभणीत विनयभंग व मारहाण प्रकरणातील आरोपींनी दाखल केलेले अपील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून, दिवाणी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे.
जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल; सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा कायम
परभणी (Parbhani molestation case) : विनयभंग व मारहाणीच्या प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींनी दाखल केलेले अपील जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावत दिवाणी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने १२ मार्च २०१८ रोजी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबात नमूद केले होते की, सकाळी घरासमोरील अंगण झाडत असताना आरोपी कल्याण शेषराव लांडे हा तिच्याजवळ आला आणि तिला जबरदस्तीने घरात नेऊन विनयभंग केला. आरडाओरड करू नये म्हणून तिचे तोंड दाबून झटापट केली. त्यावेळी पीडितेचा पती तेथे आला असता आरोपीने त्यास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर आरोपीचे वडील शेषराव लांडे व अर्जुन लांडे यांनीही लाकडी दांड्याने पीडिता व तिच्या पतीस मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.
या (Parbhani molestation case) प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोह वाय. एम. खान यांनी तपास करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केले. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी २ सप्टेंबर २०२१ रोजी आरोपी कल्याण शेषराव लांडे यास एक वर्ष सक्तमजुरी व तसेच १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तर आरोपी शेषराव आश्रोबा लांडे व अर्जुन शेषराव लांडे यांना चांगल्या वर्तणुकीच्या बंधपत्रावर समज देत नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालय, परभणी येथे अपील दाखल केले होते.
सदर प्रकरणाची (Parbhani molestation case) सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ एन. आर. नाईकवाडे यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्पेâ अॅड. आनंद गिराम यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शुक्रवार ८ मे रोजी आरोपींचे अपील फेटाळून लावत दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. आनंद गिराम यांनी काम पाहिले. तसेच पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पोउपनि सुरेश चव्हाण, पोह वैशाली बिंडे, वंदना आदोडे, धबडगे यांनी काम पाहिले.