Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

तरुण अपघाती मृत्यु

परभणीत चारचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यु...!

Youth Accidental Death: परभणीतील गंगाखेड पालम रस्त्यावर चारचाकी अपघातात धिरज जगलपुरे यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी त्याच्या प्रियसी व अशरफ ममदू पठाण विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.


परभणीत चारचाकी अपघातात तरुणाचा जागीच मृत्यु

Youth Accidental Death |

 

गंगाखेड पालम रस्त्यावरील मालेवाडी शिवारातील घटना

दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

परभणी/गंगाखेड (Youth Accidental Death) : मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या चारचाकी वाहनाच्या अपघातात ३३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना रविवार ३ मे रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी मयत तरुणाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील धिरज मोटर्स नावाने असलेल्या ऑटोमेकॅनिकल गॅरेज चालक धिरज बालासाहेब जगलपुरे वय ३३ वर्ष हा शनिवार २ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घरी काही एक न सांगता त्याची क्रेटा कार क्रमांक एमएच ४३ बीवाय ३५५५ घेऊन घराबाहेर गेला होता. धिरज याच्या गाडीचा पालम रस्त्यावरील मालेवाडी शिवारात अपघात झाल्याची माहिती रविवार ३ मे रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास सचिन लटपटे याने फिर्यादी सुरज बालासाहेब जगलपुरे यास दिली असता त्याने अपघातस्थळी जाऊन पाहणी केली.

तेंव्हा त्याच्या भावाची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात पलटी झालेल्या स्थितीत दिसली व भाऊ धिरज जगलपुरे हा ड्राइव्हर सिटवर मृतावस्थेत आढळून आल्याने बाबासाहेब नारायण पवार, राहुल उत्तमराव कदम, बाबा साळवे, गोपाळ शिंदे आदींच्या मदतीने कार खाली असलेल्या धिरज जगलपुरे यास बाहेर काढून परमेश्वर भालेराव यांच्या रुग्णवाहिकेतून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली बडे यांनी त्यास मृत घोषित केले.

अपघाताची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे, पो.उप.नि. व्यंकट गंगलवाड, पोह संतोष व्यवहारे आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. (Youth Accidental Death) याप्रकरणी मयत धिरज जगलपुरे याचा भाऊ सुरज जगलपुरे याने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित असे म्हटले की त्याचा मोठा भाऊ धिरज जगलपुरे याच्या सोबत सुमारे दोन वर्षांपासून राहत असलेल्या त्याच्या प्रियसीसोबत काही दिवसांपासून पैसे देण्याच्या कारणावरून सतत वाद होत होते.

शुक्रवार १ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास अशरफ महमदू पठाण रा. ममता कॉलनी याने सरकारी दवाखाना येथे धिरजच्या प्रियसीचा व्हिडीओ तयार करून हा व्हिडीओ इन्स्टाग्राम तसेच व्हाटसप स्टेटसवर ठेऊन सोशल मिडियावर व्हायरल केल्याने तसेच प्रियसीने सुद्धा धिरजविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यामुळे मानसिक तानतणावात धिरज जगलपुरे याने स्वतः कारचा अपघात करून मरणास कारणीभूत झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने धिरज जगलपुरे याची प्रियसी व अशरफ ममदू पठाण या दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला असुन याचा पुढील तपास पोउपनि व्यंकट गंगलवाड हे करीत आहेत.

Related to this topic: