Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी लग्नमंडप प्रकरण

परभणीच्या झरी येथे लग्न मंडपात तलवारधारी तरुणांचा धुडगुस

Parbhani Marriage Crime: परभणी जिल्ह्यातील झरी येथे लग्न सोहळ्यादरम्यान, तलवारधारी तरुणांनी पंगतीला बसलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडवला. दोन जण जखमी झाले आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला.


परभणीच्या झरी येथे लग्न मंडपात तलवारधारी तरुणांचा धुडगुस

Parbhani Marriage Crime |

 

जेवण न करताच  पंगत सोडून वर्‍हाडी मंडळी गेले
ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल..!

परभणी (Parbhani Marriage Crime) : लग्न हा आनंदाचा सोहळा, पण कधी कधी क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन भांडण, तंटे होत असतात. असाच प्रकार परभणी तालुक्यातील झरी येथील एका विवाह सोहळ्यात घडला. अचानक तलवारीधारी तरुण लग्नमंडपात शिरले. त्यामुळे पंगतीला बसलेली वर्‍हाडी मंडळी ताट सोडून घाबरुन निघून गेली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रविवार १० मे रोजी झरी येथील राधे राधे मंगल कार्यालयात विवाह सोहळा (Parbhani Marriage Crime) होता. फिर्यादी अर्जुन प्रभाकर पवार व आरोपी सुभाष जाधव यांच्यात जून्या भांडणाचा वाद होता. झरी येथील लग्न सोहळ्यात सुभाष जाधव याचे काही लेबर अर्जुन पवार यांच्या सोबत असल्याची माहिती मिळाली. याचा राग धरुन सुभाष जाधव याच्या सांगण्यावरुन कोंड्या उर्फ दशरथसिंग जून्नी रा. झरी व इतर दोन अनोळखी इसम तलवारी घेऊन लग्नमंडपात शिरले.  दोघा जणांना तलवारीचे वार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे मंडळात एकच धावपळ झाली. पंगतीला जेवायला बसलेली मंडळी ताट सोडून सैरावैरा पळत होते. त्यामुळे गोंधळ उडून अन्नाची मोठी नासाडी झाली.

 परभणी ग्रामीण पोलिसांना याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी जीवन बेनिवाल, सपोनि. जीवन राजगुरु, पोउपनि. पी.डी. मोहिते, शंकर हाके, शंकर जाधव, सुधिर डोंबे, तावरे आदी पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी  अर्जुन पवार यांनी दिलेल्या पि âर्यादीवरुन आरोपी सुभाष पवार, कोंड्या उर्फ दशरथसिंग जून्नी यांच्यासह तर दोन अनोळखी इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related to this topic: