Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी वाळू घाट

परभणीत जिल्हाधिकारी आक्रमक भूमिकेत वाळू घाट धारकांना जिल्हाधिकार्‍यांची कारणे दाखवा नोटीस...!

Parbhani Sand Ghat: परभणीत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी वाळू घाट धारकांना कारणे दाखवा नोटीस बजावली. २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले गेले.


परभणीत जिल्हाधिकारी आक्रमक भूमिकेत वाळू घाट धारकांना जिल्हाधिकार्‍यांची कारणे दाखवा नोटीस

Parbhani Sand Ghat |

कार्यारंभ आदेशातील अटी व शर्तींचे पालन नाही  २४ तासांत खुलासा सादर करण्याचे आदेश..!

परभणी (Parbhani Sand Ghat) : पाथरी तालुक्यातील वाळूघाट लिलावधारकासह  परभणी जिल्ह्यातील इतरही ठेकेदाराना जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. बुधवार ६ मे  रोजी नोटीस काढण्यात आली  असून वाळू  निर्गती धोरण २०२५ अंतर्गत देण्यात आलेल्या कार्यारंभ आदेशातील अटी व शर्तींचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने ई लिलाव प्रक्रियेद्वारे संबंधित वाळूघाट मंजूर केले होते. मात्र अनेक वाळू घाटधारकांनी आदेशातील महत्त्वाच्या अटींचे पालन न केल्याचे समोर आले आहे. विशेषत: वाळूघाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचे चित्रण प्रशासनास उपलब्ध करून न देणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील (Parbhani Sand Ghat) घरकुल लाभार्थ्यांना उत्खनित वाळूपैकी १० टक्के वाळू विनामूल्य दिल्याचा अहवाल न सादर करणे, दैनंदिन उत्खनन विक्री व वाहतूक नोंदवही उपलब्ध न करणे तसेच वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्‍या वाहनांची माहिती न देणे या त्रुटी निदर्शनास आल्या आहेत.

याबाबत संबंधित वाळूघाट धारकांना नोटीस प्राप्त झाल्यानंतर २४ तासांच्या आत लेखी खुलासा आणि अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अन्यथा करारनाम्यातील अटींचा भंग केल्याप्रकरणी अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. परभणी, सेलू, गंगाखेड, पाथरी येथील उपविभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील संबंधित तहसीलदारांना देखील सूचना देण्यात आल्या असून घाटधारकांकडून अटींचे उल्लंघन होत असल्यास तात्काळ दंडात्मक कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी यांनी नोटीस बजावण्यात आलेले ठेकेदार
१) सय्यद गुलशेर खान रौफ, मे. कोहिनूर कन्स्ट्रक्शन, पाथरी
२) ए.पी. कन्स्ट्रक्शन, अबरार नियाज खान पठाण, लातूर
३) श्री .दुर्गेश शांताराम पाटील, गजानन इंटरप्रायजेस, पुणे
४) प्रâेंडस् बिल्डींग मटेरियल सप्लायर्स, मेहराजुद्दीन शेख निजामोद्दीन, नांदेड
५) काळेश्वर कन्स्ट्रक्शन, कृष्णा बाबुराव हंबर्डे, नांदेड
६) मातोश्री ट्रेडिंग कंपनी, रामप्रसाद मोतीराम पवार, पालम
७) मकदुम हबीब स. जुनेद, अर्थमुव्हर्स सप्लायर्स, नांदेड
८) रमेश पंडितराव गिते, गणराज अर्थमुव्हर्स, जिंतूर
९) बालाजी इलेक्ट्रीकल्स अ‍ॅण्ड पावर प्रोजेक्ट्स, परभणी
१०) साई अर्थमुव्हर्स अ‍ॅण्ड बिल्डींग मटेरियल सप्लायर्स, धनाजी बाबाराव दिघे, नांदेड

Related to this topic: