Breaking News
  • केवळ चाकणकरांवर कारवाई का? खऱ्या सूत्रधारांना का वाचवताय? – नाना पटोलेंचा रोकठोक सवाल
  • राज्यसभेचे खासदार रामराव वडकुते हेल्मेट न घालता चार्जिंग स्कूटीवरून कलेक्टर ऑफिसला पोहचले
  • पुण्यातील सर्व VIP, VVIP ची ताफ्यातील वाहने अर्ध्याने कमी करण्यात आली आहेत
  • सोलापूर - अक्कलकोट शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा 22 गाड्यांचा ताफा
  • सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात स्वामींचे मनोभावे घेतले दर्शन
  • फडणवीसांचा दुचाकी प्रवासाने वेधले लक्ष; शेलार-परब संवादावर मिश्किल व्हिडिओ व्हायरल
  • देवास येथील एका कारखान्यात जोरदार स्फोट झाला असून या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आम्ही बोलायला लागलो की,तुमची अडचण होईल; मंत्री चंद्रकांत पाटलांचा आमदार जयंत पाटलांना इशारा
  • मंत्री नितेश राणे, आदिती तटकरे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

सेलू घर हल्ला

परभणीच्या सेलूमध्ये घरावर हल्ला; डीजे जनरेटरसह मालमत्तेला आग

Selu House Attack: परभणीच्या सेलूमध्ये घरावर हल्ला; डीजे जनरेटरसह मालमत्तेला आग. ८ जणांसह इतरांवर गुन्हा दाखल. १७ ते १८ एप्रिल रोजी मध्यरात्रीची घटना.


परभणीच्या सेलूमध्ये घरावर हल्ला डीजे जनरेटरसह मालमत्तेला आग

Selu House Attack |

 

८ जणांसह इतरांवर गुन्हा दाखल; १७ ते १८ एप्रिल रोजी मध्यरात्रीची घटना

परभणी (Selu House Attack) : सेलू शहरातील गायत्री नगर परिसरात १७ ते १८ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काही जणांनी एकत्र येत घरावर हल्ला करून तोडफोड, जाळपोळ व चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात मंगळवार ५ मे रोजी ८ जणांसह इतरांवर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिलवान मिलिंद साळवे (वय ३२, रा. गायत्री नगर, सेलू) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीचे मेव्हणे बुद्धभूषण ढगे यांच्या घराजवळ आरोपींनी जमाव करून कट रचला.  ढगे हे (Selu House Attack) खून प्रकरणातील आरोपी असल्याने त्यांच्या नातेवाईकांना धमकावण्याच्या उद्देशाने आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना ‘घरासकट जाळून टाकू’ अशा धमक्या दिल्या. यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर उभी असलेली पिकअप गाडी व त्यातील डीजे जनरेटरला आग लावून सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान केले. तसेच ढगे यांच्या घरासमोर उभी असलेली मोटारसायकल जाळून सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान केले.

घरात अनधिकृत प्रवेश करून घरातील साहित्याची तोडफोड करत सुमारे २ लाखांचे नुकसान केले. याशिवाय कपाट फोडून त्यातील दागिने व रोख रक्कम चोरी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. या (Selu House Attack) प्रकरणी अ‍ॅड. विष्णु ढोले, योगेश चंडेलिया, विशाल वाकळे, अर्जुन बावीसे, टिल्या उर्फ पिल्या पालवे, सम्राट धापसे, अक्षय साळवे यांच्यासह इतर ३ ते ४ जणांवर विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाकेर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान सदरिल प्रकरणी उशिराने गून्हा दाखल करण्यात आल्याने  या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप आणि व्यक्तीगत वादातून अ‍ॅड. विष्णू ढोले यांना गोवण्याचे षडयंत्र असल्याची चर्चा शहरातील  नागरीक करत आहेत.

Related to this topic: