Parbhani Youth Death: गंगाखेडतालुक्यातील झोला पाटी परिसरात १५ मे रोजी झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातातील तरुणाचा १ जून रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यु झाला असुन याप्रकरणी एका दुचाकी चालकाविरुद्ध
दुचाकी चालकाविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी (Parbhani Youth Death) : गंगाखेडतालुक्यातील झोला पाटी परिसरात १५ मे रोजी झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातातील तरुणाचा १ जून रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यु झाला असुन याप्रकरणी एका दुचाकी चालकाविरुद्ध मंगळवार २ जून रोजी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की वेल्डिंगच्या कामासाठी खरबडा येथून गंगाखेड दरम्यान दररोज ये जा करणाऱ्या आरबाज युनूस पठाण या तरुणाच्या एमएच २२ बीएच ३७२९ क्रमांकाच्या दुचाकीला १५ मे रोजी सायंकाळी अंदाजे ६ वाजेच्या सुमारास एमएच २१ बीएक्स ६६०८ क्रमांकाच्या दुचाकी चालकाने त्याची दुचाकी भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवून जोराची धडक दिल्याने अरबाज युनूस पठाण हा (Parbhani Youth Death) गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून परभणी येथे हलविले असता त्याची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले.
येथे उपचार सुरु असतांना सोमवार १ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अरबाज युनूस पठाण वय २८ वर्ष याचा मृत्यु (Parbhani Youth Death) झाल्याची फिर्याद सद्दाम युनूस पठाण वय ३२ वर्ष रा. खरबडा ता. पूर्णा यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून मंगळवार २ जून रोजी रात्री उशिराने दुचाकी क्रमांक एमएच २१ बीएक्स ६६०८ च्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.