Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी व्यापारी फसवणूक

परभणीतील व्यापार्‍याची ३६ लाखाची फसवणूक

Parbhani Trader Fraud: परभणीत रिधिमा असनानी नावाची महिला व्हॉट्सअपवर ऑनलाईन लिंक वापरून ३६ लाखाची फसवणूक करत होती. परतावा देणे बंद झाल्यावर पोलिसास तक्रार दाखल


परभणीतील व्यापार्‍याची ३६ लाखाची फसवणूक

Parbhani Trader Fraud |

 

कापड उद्योगातील गुंतवणुकीवर परताव्याचे अमिष कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल...!

परभणी (Parbhani Trader Fraud) : कापड उद्योगात गुंतवणुक करुन त्यावर परताव्या देण्याचे अमिष दाखवत व्हॉट्स अ‍ॅपवर ऑनलाईन लिंक पाठवून टप्प्याटप्प्याने व्यापार्‍याकडून ३६ लाख रुपये घेतले. त्यानंतर परतावा देणे बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यापार्‍याने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

या (Parbhani Trader Fraud) बाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, श्रीनाथ खानापूरे यांनी तक्रार दिली आहे. आरोपी व्हॉट्स अ‍ॅप क्रमांक धारक महिला रिधिमा असनानी हिच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. २९ मे ते १५ जुलै २०२६ या दरम्यान सदर महिलेने फिर्यादीच्या व्हॉट्स अ‍ॅपवर ऑनलाईन लिंक पाठविली. कापड उद्योगात गुंतवणूक केल्यास अधिक परतावा देण्याचे सांगितले. त्यानुसार व्यापार्‍याने सुरुवातीला काही रक्कम टाकली. या रक्कमेवर परतावा देखील मिळाला. त्यानंतर व्यापार्‍याने टप्प्या टप्प्याने ३६ लाख रुपये पाठविले. काही दिवसांनी परतावा मिळणे बंद झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने व्यापार्‍याने कोतवाली पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. तपास पोनि. संजय निकुंभ करत आहेत.