Stray Dogs Attack: पाथरी शहरातील महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीजवळ मंगळवारी सकाळी मोकाट कुत्र्याने पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिच्या चेहर्यावर व मानेजवळ गंभीर चावा घेतल्याची घटना
चेहरा, मानेला गंभीर दुखापत; महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीजवळील घटना
परभणी (Stray Dogs Attack) : पाथरी शहरातील महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीजवळ मंगळवारी सकाळी मोकाट कुत्र्याने पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिच्या चेहर्यावर व मानेजवळ गंभीर चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
महावितरणमध्ये लाईनमन म्हणून कार्यरत असलेले रणजीत देशमुख यांची मुलगी स्वराली (वय ५) ही मंगळवार ७ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वा. सुमारास घराजवळ खेळत असताना गल्लीतील मोकाट कुत्र्यांपैकी एका कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घालत चेहर्यावर, नाकाजवळ तसेच मानेजवळ चावा घेतला. या (Stray Dogs Attack) हल्ल्यात ती जखमी झाली. घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने पाथरी येथील वरद हॉस्पिटलमध्ये या खाजगी दवाखान्यात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीच्या परिसरात पाच ते दहा मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. या कुत्र्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचार्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने (Stray Dogs Attack) मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.