Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी स्कार्पिओ अपघात

परभणीत भरधाव स्कार्पिओचा अपघात; एकाचा मृत्यू,दोघे जखमी

Parbhani Scorpio accident: गंगाखेड येथील भरधाव वेगातील स्कार्पिओ वाहनाचा अपघात झाल्याने एकाचा मृत्यू व दोघे जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवार ३ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० ते ८:४० वाजे दरम्यान


परभणीत भरधाव स्कार्पिओचा अपघात एकाचा मृत्यूदोघे जखमी

Parbhani Scorpio accident |

 

बनपिंपळा पाटीवरील घटना; गंगाखेड पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद....!

परभणी (Parbhani Scorpio accident) : गंगाखेड येथील भरधाव वेगातील स्कार्पिओ वाहनाचा अपघात झाल्याने एकाचा मृत्यू व दोघे जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना सोमवार ३ ऑगस्ट रोजी रात्री ८:३० ते ८:४० वाजे दरम्यान गंगाखेड परळी रस्त्यावरील बनपिंपळा पाटीवर घडली. हनुमान गंगाराम गोरे रा. आडगाव खरात ता. माजलगाव असे मयताचे नाव आहे.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड परळी रस्त्याने भरधाव वेगात जाणारी स्कार्पिओ क्रमांक एमएच ४४ बी २९०२ हे वाहन बनपिंपळा पाटीवर रस्त्याच्या कडेला जाऊन अपघातग्रस्त झाले.

या (Parbhani Scorpio accident) अपघाताची माहिती पप्पू बचाटे यांनी खाजगी रुग्णवाहिका चालक रावण भालेराव यांना देताच रावण भालेराव, रामेश्वर भालेराव, दिपक गव्हाणे आदींनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थ व अन्य वाहन धारकांच्या मदतीने अपघातातील जखमी ज्योतीराम धोंडीराम काळे वय ४२ वर्ष, सतिश सर्जेराव यमगर वय ४८ वर्ष व हनुमान गंगाराम गोरे वय ३८ वर्ष सर्व रा. आडगाव खरात ता. माजलगाव जि. बीड यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक कातकडे, परिचारिका अंकिता कदम, भारत भदर्गे आदींनी जखमीवर प्रथमोपचार करून गंभीर जखमी असलेल्या ज्योतीराम धोंडीराम काळे व सतिश सर्जेराव यमगर यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविले तर हनुमान गंगाराम गोरे यांना मयत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांनी सपोनि शिवराज हाळे, पोलीस अंमलदार सतिशकुमार पांढरे यांना घटनास्थळी रवाना करून अपघाताची माहिती घेतली. मंगळवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी पोह संदीप जाधव, पोशि संगमेश्वर नलबले यांनी पंचनामा केल्यानंतर मयताचे भाऊ शरद गंगाराम गोरे वय ३५ वर्ष यांनी याप्रकरणी दिलेल्या खबरीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अपघाती (Parbhani Scorpio accident) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.

Related to this topic: