Parbhani Deputy Registrar: वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीधर पी.टी. घुगे, भगवान दुधाटे, एम. डी. शिंदे यांची उपनिबंधक, सहकारी संस्था पदी पदोन्नती
पी.टी. घुगे, भगवान दुधाटे, एम.डी. शिंदे यांना पदोन्नती; परभणीकरांनी केला कौतुकाचा वर्षाव
परभणी (Parbhani Deputy Registrar) : जिल्ह्याच्या तीन भूमिपुत्रांनी परभणीकरांची मान उंचावली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर पदवीधर पी.टी. घुगे, भगवान दुधाटे, एम. डी. शिंदे यांची उपनिबंधक, सहकारी संस्था पदी पदोन्नती झाली आहे.
जिंतूर तालुक्यातील डिग्रस येथील रहिवाशी पंढरीनाथ घुगे यांची पुणे शहरासाठी उपनिबंधक म्हणून पदोन्नती झाली आहे. तर भगवान दुधाटे हे पूर्णा तालुक्यातील देऊळगाव येथील रहिवाशी आहेत. त्यांची ठाणे येथे (Parbhani Deputy Registrar) उपनिबंधक म्हणून पदोन्नती झाली आहे. तर गंगाखेड तालुक्यातील मसला येथील रहिवाशी माधव देवराव शिंदे यांची डी. विभाग, मुंबई येथे उपनिबंधकपदी पदोन्नती झाली आहे.या तिन्ही भूमिपुत्रांनी परभणी जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला आहे.
परभणी करांतून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या (Parbhani Deputy Registrar) पदोन्नती बद्दल पी. डी. देशमुख (मुख्य गुण नियंत्रक अधिकारी, कृषि विभाग, पुणे) , माजी जि.प. सदस्य अजित मगर, कृषि अधिकारी बबन वाघ, रवि हरणे, बाबासाहेब काळदाते, पोलीस निरिक्षक जयप्रकाश गुट्टे, पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, विष्णुपंत मुंडे, कल्याण पाटील, राहुल दराडे, सारंग घुगे, कमलाकर सांगळे, दिनेश दुधाटे, मुकुंद खिस्ते पाटील, दिपक नागुरे, गणेश पार्डे, सुभाष ठोंबरे, माधव यादव, गुलाब शिंदे, अच्युत तळणीकर, प्रशांत गायकवाड, सतीश कंची, सतीश सोळूंके आदीसह कृषिमित्रांनी अभिनंदन केले.