Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी पोलिस दगडफेक

परभणीत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

Parbhani police Stone-pelting: मध्यरात्री परभणीत साखला प्लॉट येथे पोलिस पथक आरोपींना शोधासाठी गेल्यानंतर बेकायदेशीर जमावाने दगडफेक केला. पोउपनि नारायण दुधाटे यांच्यावर गुन्हा


परभणीत आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दगडफेक

Parbhani police Stone-pelting |

 

परभणी शहरातील साखला प्लॉट भागातील घटना कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल...!

परभणी (Parbhani police Stone-pelting) : निजामाबाद येथील पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये आरोपींच्या शोधासाठी पोलिसांचे पथक परभणी येथे आले होते. या पथकाला मदतीस म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी देखील होते. शहरातील साखला प्लॉट येथे आरोपींना ताब्यात घेतल्यावर जमलेल्या बेकायदेशीर जमावाने पोलिसांवर दगडफेक करत शासकीय कामात अडथळा केला. ही घटना बुधवार १७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोउपनि. नारायण दुधाटे यांनी फिर्याद दिली आहे. निजामाबाद आणि परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक साखला प्लॉट येथे आरोपींच्या शोधासाठी गेले होते. या पथकाने काही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना गाडीमध्ये बसवत असताना आरोपीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या गाडी जवळ येऊन जोरजोरात आरडा ओरड केली. शिवीगाळ करत पोलीस पथकावर दगडफेक केली. सुदैवाने या (Parbhani police Stone-pelting) घटनेत कोणताही अंमलदार जखमी झाला नाही. हातात तलवार फिरवत आरोपींना पळवून जाण्यास मदत करण्यात आली.

या प्रकरणी आवतार सिंग टाक, करणसिंग टाक, कृष्णासिंग टाक, अनिता टाक, संगीता कौर, मिराबाई टाक, निकिता टाक, गगनसिंग टाक, जोगिंदर सिंग टाक, कालूसिंग टाक यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.