Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी गाई चोरी

परभणीत मध्यरात्री भरवस्तीतून गाईची चोरी; कारमध्ये कोंबतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद

Parbhani Cow Theft: शहरातील लक्ष्मी नगर परिसरात मंगळवारी (२१ जुलै) मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एका गाईला गळफास लावून जबरदस्तीने चारचाकी कारमध्ये कोंबून चोरून नेल्याची धक्कादायक घटना


परभणीत मध्यरात्री भरवस्तीतून गाईची चोरी कारमध्ये कोंबतानाचा थरार सीसीटीव्हीत कैद

Parbhani Cow Theft |

लक्ष्मी नगरातील धक्कादायक प्रकार;
चारचाकीचा वापर करून गाईची चोरी, पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू

परभणी () : शहरातील लक्ष्मी नगर परिसरात मंगळवारी (२१ जुलै) मध्यरात्री दोनच्या सुमारास गाईची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात चोरट्यांनी रस्त्यावर बसलेल्या गाईला अमानुषपणे ओढत चारचाकी कारच्या मागील भागात जबरदस्तीने कोंबले आणि तेथून पलायन केले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

लक्ष्मी नगरातील जीवन कुलकर्णी व अशोक देशमुख यांच्या घरासमोरील रस्त्यावर हा प्रकार घडला. मध्यरात्री एक संशयित चारचाकी कार तेथे आली. कारमधून उतरलेल्या चोरट्यांनी गाईच्या गळ्यात फास टाकून तिला जबरदस्तीने कारमध्ये कोंबले. त्यानंतर काही क्षणांतच त्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गाईची चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. भरवस्तीत अशा प्रकारे चारचाकी वाहनाचा वापर करून चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते बबलू नागरे यांनी या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षकांना दिली असून, भरवस्तीत मध्यरात्री चारचाकी वाहनातून गाईची चोरी होणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही परभणी शहरातील विविध भागांतून गाई चोरीच्या अनेक घटना घडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणांतील संशयितांवर ठोस कारवाई झालेली नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून गाई चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी जोर धरत आहे.

Related to this topic: