Parbhani Municipality: परभणीतील मनपा सभेत राष्ट्रवादी व भाजपचे नगरसेवक स्थायी समिती सदस्य निवडीवर आक्षेप घेऊन गोंधळ घातला. सभेत विलंबाने प्रवेश करणाऱ्या सदस्यांना बोलण्याची संधी न मिळाल्याचा आरोप.
राष्ट्रवादी, भाजपचे नगरसेवक आक्रमक; स्थायी समिती सदस्य निवडीवर आक्षेप
परभणी (Parbhani Municipality) : शहर मनपाच्या आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेत चांगलाच गदारोळ उडाला. नियोजित २.३० वाजताची सभा उशीराने सुरु झालेली असतानाही राष्ट्रवादी, भाजपाचे काही सदस्य सभागृहात दाखल झाले. तो पर्यंत स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया आटोपली होती. मात्र नंतर आलेल्या भाजपा, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आम्हाला बोलू द्या असे म्हणून गोंधळ घातला. सभा आटोपल्यानंतर सदस्यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला.
मनपाची (Parbhani Municipality) बी.रुघुनाथ सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर सय्यद इकबाल, उप महापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेर, नगर सचिव विकास रत्नपारखी आदींची उपस्थिती. यावेळी राष्ट्रवादी, भाजपाचे काही सदस्य बाहेरच होते. सभागृहात विषय वाचन, स्थायी समिती सदस्यांची निवड प्रक्रिया सुरु होते. दरम्यान बाहेर असलेल्या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला. मात्र सभा तो पर्यंत आटोपती घेऊन राष्ट्रगीत सुरु होते. राष्ट्रगीत सुरु असताना उशीराने आलेले सदस्य सुध्दा शांत उभे होते.
मात्र राष्ट्रगीत संपल्यानंतर सदस्यांनी सभेत सदस्य निवडीवर आक्षेप घेतला. मात्र सभा संपली, असे म्हणून महापौर, उप महापौर सभागृहाबाहेर निघून गेले. मात्र आम्हाला बोलू देत नसल्याचा आरोप करत नगरसेविकांनी हा गोंधळ घातला आहे. यानंतर (Parbhani Municipality) राष्ट्रवादी, भाजपाच्या नगरसेवकांनी मनपा आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या कक्षात धाव घेतली. समितीवर आक्षेप घेत सदस्यांनी दालनात ठिय्या मांडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह जामकर, अक्षय देशमुख, आकाश लहाने, शेख नईम, अर्जुन सामाले, भाजपाचे मोकिंद खिल्लारे, रितेश जैन, डॉ. केदार खटींग, विश्वजीत बुधवंत, अद्वैत पार्डीकर, अमोल वाघमारे, अपक्ष सागर गंगाळे, मिलिंद बामणीकर आदी सदस्य उपस्थित होते.