Parbhani Municipal Employees: महापालीका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी वेतन थकल्याने सोमवार १० ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. बुधवार १२ ऑगस्ट रोजी कर्मचार्यांनी भिक मांगो आंदोलन
शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा
जीएसटी अनुदान, फरकाची रक्कम देण्याची मागणी
परभणी (Parbhani Municipal Employees) : महापालीका कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांनी वेतन थकल्याने सोमवार १० ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. बुधवार १२ ऑगस्ट रोजी कर्मचार्यांनी भिक मांगो आंदोलन केले. शनिवार बाजार येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाकाढत कर्मचार्यांनी शासना विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात भिक मागून जमा झालेली रक्कम प्रशासनाला देत निषेध नोंदविण्यात आला.
कर्मचार्यांचे पाच महिण्याचे वेतन, सेवानिवृत्ती वेतन थकले आहे. त्यात (Parbhani Municipal Employees) महापालीकेला जीएसटी अनुदान फरकाची रक्कम मिळाली नाही. ७२ कोटी रुपयाचे अनुदान मिळाल्यास महापालीकेतील (Parbhani Municipal Employees) अर्थीक प्रश्न निकाली निघण्यास मदत होईल. मात्र हा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. वेतन नसल्याने कर्मचार्यांवर आर्थीक संकट ओढावले आहे. वेतन, जीएसटी अनुदान फरकाकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचार्यांनी सोमवार पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. बुधवार १२ ऑगस्टला भिक मांगो आंदोलन केले आहे.
आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष नासेर खान, विनय ठाकूर, विशाल उफाडे, नजम खान, के.के.भारसाकळे, अभिजीत कुलकर्णी, अनुसया जोगदंड, विश्वनाथ गोबाडे, खाजा मोईनखान, अतिक अहेमद, शिला गायकवाड, सिताबाई तांबे, शोभाबाई सालगुडे, नंदाबाई सोनवणे, गुलाबबाई मंदेवाड, ज्योती मोरे, सुनिता घोगरे, रेखा आवटे, संदिप पवार, प्रकाश गायकवाड, मोहन वाघमारे, भागवत कडनोर यांच्यासह मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने झाले.