Breaking News
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आज शेगाव खामगाव दौऱ्यावर
  • लोणावळा–देवले मार्गावर दरड कोसळून मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर
  • शाळेच्या प्रांगणात खेळताना विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; बीडमध्ये खळबळ
  • डॉक्टरांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जामीन मंजूर
  • खामगाव ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १३ जणांविरुद्ध गुन्हा
  • पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांमुळे रस्त्याची झाली चाळण
  • रत्नागिरी-शहरातील पटवणे फगरवठार रस्ता पुन्हा खचला
  • भंडाऱ्यात तीन वर्षीय बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेने तीव्र संताप
  • एका दिवसात सोने ८०० रूपये तर चांदी तब्बल ₹ ५ हजारांनी महाग

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी मनपा सभा

परभणीत विरोधक आक्रमक; मनपाची सर्वसाधारण सभा वादळी होणार

Parbhani Municipal Corporation: शहर महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बी.रघुनाथ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.


परभणीत विरोधक आक्रमक मनपाची सर्वसाधारण सभा वादळी होणार

Parbhani Municipal Corporation |

 

बुधवारी सभेचे आयोजन, शहर विकासाच्या मुलभूत प्रश्नांना बगल

परभणी (Parbhani Municipal Corporation) : शहर महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवार २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता बी.रघुनाथ सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या विषय पत्रिकेत विरोधी सदस्यांनी दिलेले शहर विकासाचे मुलभूत प्रश्न चर्चेसाठी समाविष्ट करण्यात आलेले नाहीत. याच मुद्यांवर विरोधक आक्रमक होणार असून सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारणार आहेत. महापालिकेची सर्वसाधारण सभा वादळी होणार असल्याचे दिसत आहे. 

बुधवारच्या सर्वसाधारण सभेत मागील सभेचे इतीवृत्तांत कायम करणे, रोजंदारी मधून नियमित सेवेत कायम करणे, त्याच प्रमाणे विविध योजनेतील कामांची निवड करून ते मान्यतेसाठी सभेसमोर ठेवणे, असे विषय चर्चेस येणार आहे. मनपा सदस्यांकडून प्राप्त घरपट्टी लावणे, कबालेधारक व नोटीस धारक यांना रजिस्ट्रीची अट शिथील करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देणे हे विषय चर्चेला येणार आहे. मात्र सर्वसाधारण सभेत विरोधी सदस्यांनी दिलेले शहर विकासाशी संबंधित मुलभूत विषय चर्चेसाठी समाविष्ट करण्यात आलेले नाहीत.

त्यामुळे सदस्य आक्रमक होणार असून महापालिका अधिनियम कलम ५ अन्वये सदर विषय सभागृहात चर्चेसाठी घेण्याकरीता आक्रमक होणार आहेत.   आम्ही सभागृहात बोलणार 
महापालिका अधिनियम कलम ५ अन्वये आम्ही आमच्या दिलेल्या विषयावर सभागृहात बोलणार आहोत. सर्वसाधारण सभेत सोयीचे विषय घेण्यात आले आहे. शहर विकासाच्या मुद्यावर सभागृहात चर्चा करणार आहोत. - रितेश जैन, मनपा सदस्य.

सभागृहात प्रश्न उचलणार
सर्वसाधारण सभेत चर्चेसाठी जे विषय दिले होते. सदरचे विषय शहर विकासाशी संबंधीत जिव्हाळ्याचे विषय होते. सभेमध्ये विकासाचे मुद्दे उचलून सत्ताधार्‍यांना प्रश्न विचारणार. 
-सागर गंगाळे, मनपा सदस्य.

Related to this topic: