Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

महादेव मंदिर दान चोरी

परभणीतील एकलिंगजी महादेव मंदिराची दानपेटी फोडून लाखोंची चोरी

Mahadev Mandir Daan Chori: एकलिंगजी महादेव मंदिरात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून त्यातील रोकड व दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. वर्षभर भाविकांनी अर्पण केलेली देणगी चोरी


परभणीतील एकलिंगजी महादेव मंदिराची दानपेटी फोडून लाखोंची चोरी

Mahadev Mandir Daan Chori |

सिंगणापूर फाटा येथील घटना; सीसीटीव्हीत चोरटा कैद, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

परभणी (Mahadev Mandir Daan Chori) : तालुक्यातील सिंगणापूर फाटा येथील एकलिंगजी महादेव मंदिरात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दानपेटी फोडून त्यातील रोकड व दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली. वर्षभर भाविकांनी अर्पण केलेली देणगी चोरीस गेल्याने परिसरात संताप व्यक्त होत असून, संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.

परभणी तालुक्यातील सिंगणापूर फाटा येथील (Mahadev Mandir Daan Chori) एकलिंगजी महादेव मंदिरात मध्यरात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून दानपेटी फोडली. दानपेटीत वर्षभर भाविकांनी अर्पण केलेली रोकड व दागिने ठेवण्यात आले होते. चोरट्याने दानपेटीतील नोटा बॅगेत भरून नेल्या, तर एक, दोन, पाच आणि दहा रुपयांची नाणी घटनास्थळीच टाकून पोबारा केला.

या (Mahadev Mandir Daan Chori) चोरीत लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून, फुटेजमध्ये चोरट्याने चेहऱ्यावर रुमाल बांधल्याचे स्पष्ट दिसत आहे. आरोपीच्या हालचालीही कॅमेर्‍यात रेकॉर्ड झाल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. जी. सोनेत, पोलीस उपनिरीक्षक निखिल पवार, सिद्धेश्वर घुगे, विठ्ठल कुंडगीर, बळीराम करवर तसेच ठसेतज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Related to this topic: