Parbhani Lightning Death: जिंतूर तालुक्यात बुधवार १३ मे रोजी वादळी वारा व अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. याचवेळी चिंचोली काळे येथे अल्पभूधारक शेतकर्याच्या बैलावर वीज कोसळून बैलाचा मृत्यू
चिंचोली काळे येथे अवकाळी पाऊस मदतीसाठी शेतकर्याचा टाहो
परभणी (Parbhani Lightning Death) : जिंतूर तालुक्यात बुधवार १३ मे रोजी वादळी वारा व अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले होते. याचवेळी चिंचोली काळे येथे अल्पभूधारक शेतकर्याच्या बैलावर वीज कोसळून बैलाचा मृत्यू झाला. घटनेत शेतकर्याचा चाळीस हजारांचा बैल पेरणीच्या ऐन तोंडावर दगावला आहे. संबंधित शेतकर्याने तहसील प्रशासनाकडे मदतीचा हात मागितला आहे.
जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव सज्जा अंतर्गत चिंचोली काळे येथे अल्पभूधारक शेतकरी माणिक किशनराव काळे यांचे गाव शिवारात गट क्रमांक २२४ मध्ये २ एकर शेत आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ते तीन शेळ्या, एक मेंढी व वीस कोंबड्यांचा सांभाळ करतात. शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे दोन बैल होते. गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसात वीज अंगावर पडून (Parbhani Lightning Death) त्यांचा एक बैल दगावल्याने ते सध्या हवालदील झाले आहेत. पोलीस पाटील रामेश्वर काळे यांनी घटनेची माहिती तलाठी धनंजय सोनवणे व पशुवैद्यकीय अधिकारी पी बी कनसटवाड यांना दिली. घटनास्थळी अधिकार्यांनी भेट देऊन पंचनामा केला. पंचनाम्यावर सुभान काळे, गौतम मोरे, विठ्ठल मोरे, राहुल काळे, लिंबा कोरडे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.