Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

जिंतूर बसस्थानक गुन्हा

परभणीत महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र लंपास

Jintur Bus Stand Crime: जिंतूर  येथील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सुमारे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याच्या मण्यांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली..


परभणीत महिलेच्या गळ्यातील पाच ग्रॅमचे मंगळसूत्र लंपास

Jintur Bus Stand Crime |

 

जिंतूर बसस्थानकातील घटना; अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल

परभणी (Jintur Bus Stand Crime) : जिंतूर  येथील बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील सुमारे पाच ग्रॅम वजनाचे सोन्याच्या मण्यांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी जिंतूर पोलिस ठाण्यात बुधवारी २९ जुलै रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश्चंद्र राम मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ जुलै रोजी दुपारी १.४० वाजण्याच्या सुमारास (Jintur Bus Stand Crime) जिंतूर बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील अंदाजे पाच ग्रॅम वजनाचे, सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याच्या मण्यांचे मंगळसूत्र लंपास केले. फिर्यादीने उशिराने तक्रार दिल्याने बुधवार २९ जुलै रोजी या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नामदेव रेड्डी यांच्या आदेशानुसार या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नसीब खान पठाण करीत आहेत.

Related to this topic: