Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

खासदार संजय जाधव

परभणीत खा. संजय जाधव यांच्या समर्थनात परभणीत दुग्धाभिषेक; जनहितकारी निर्णयाचे स्वागत

MP Sanjay Jadhav: परभणीत खा. संजय जाधव यांच्या निधनावर शिवसेनाचे पदाधिकारी सहित अनेक लोकांनी उपस्थित होते. त्यांचे समर्थनासाठी राबविला गेल्या दुग्धाभिषेक कार्यक्रमात जनहितकरी कार्योंचा कौतुक


परभणीत खा संजय जाधव यांच्या समर्थनात परभणीत दुग्धाभिषेक जनहितकारी निर्णयाचे स्वागत 

MP Sanjay Jadhav |

 

जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहचेल-आनंद भरोसे

परभणी (MP Sanjay Jadhav) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खा. संजय जाधव यांनी  शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर  जिल्ह्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्या अनुषंगाने  त्यांच्या समर्थनात  शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी खा. जाधव यांच्या समर्थनात शहरातील शिवाजी चौकात  स्वागताच्या घोषणाबाजी करीत  त्यांच्या प्रतिमेला  दुग्धाभिषेक केला. शनिवार २० जून रोजी सकाळी १० वाजता शिवाजी चौकात खा. संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांच्या समर्थनात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते  जमा झाले होते.  

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, महिला जिल्हाप्रमुख गीताताई सूर्यवंशी, जिल्हा संघटक डॉ. मदन लांडगे, उपजिल्हा प्रमुख मारोती पवार, बाळासाहेब पानपट्टे, वटाणे, विधानसभा संघटक संदीप जाधव, महानगर प्रमुख माणिक पोंढे, तालुका संघटक उद्धव गायकवाड, उप तालुकाप्रमुख सुभाष गरुड, बाळासाहेब मोहटे, शहरप्रमुख सचिन पाटील, पप्पू वाघमारे, अरुण झांबरे, निखील जैन, संजय शामार्थी, अशोक गव्हाणे, राहुल ठाकूर, प्रवीण टेकाळे, दीपक शिंदे, राहुल काळे, नीरज बुचाले यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. उपस्थित शिवसैनिकांनी खा. संजय जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी घेतलेल्या जनहितकारी निर्णयांचे कौतुक करण्यात आले.  कार्यक्रमादरम्यान उपस्थित पदाधिकार्‍यांनी खा. संजय जाधव यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरव केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांनी बोलताना खा. संजय (बंडू) जाधव (MP Sanjay Jadhav) यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्हा विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल असा विश्वास व्यक्त केला. घोषणाबाजी, जल्लोष आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर शिवसेनामय झाला होता.

Related to this topic: