Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी अवैध वाळू उत्खनन

परभणीच्या अवैध वाळू उत्खनन; अभिलेखे सादर न केल्याने वाळू घाट तात्काळ बंद..

Parbhani Illegal sand mining:


परभणीच्या अवैध वाळू उत्खनन अभिलेखे सादर न केल्याने वाळू घाट तात्काळ बंद

Parbhani Illegal sand mining |

 

जिल्हाधिकार्‍यांचे आदेश; प्रशासनाचा वाळू माफियांवार मोठा दणका

परभणी (Parbhani Illegal sand mining) : जिल्ह्यातील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी तात्काळ कठोर कारवाई करत घाट बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. संबंधित ठेकेदाराकडून वारंवार मागणी करूनही आवश्यक अभिलेखे, उत्खनन परवानग्या, वाहतूक नोंदी तसेच महसूल संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नियमभंगाची गंभीर दखल घेत ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल विभाग व खनिकर्म विभागाच्या अधिकार्‍यांनी संयुक्त तपासणी केली असता घाट परिसरात मंजूर क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी नदीपात्रात मोठे खड्डे पडल्याचेही आढळून आले. यामुळे (Parbhani Illegal sand mining) पर्यावरणीय समतोल धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तपासणा दरम्यान संबंधित घाट चालकांकडे आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती. मात्र, वेळोवेळी सूचना देऊनही संपूर्ण अभिलेखे सादर करण्यात आले नाहीत.

यामुळे शासन नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी वाळू घाट तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. तसेच पुढील चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे उत्खनन व वाहतूक न करण्याचे निर्देश दिले आहेत. या कारवाईमुळे अवैध वाळू व्यवसायाशी संबंधितांमध्ये मोठी खळबळ उडाली असून महसूल विभागाने घाट परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके नियुक्त केली आहेत. नियमांचे उल्लंघन करून वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Parbhani Illegal sand mining) अवैध वाळू उत्खननामुळे नदीपात्राचे मोठे नुकसान होत असून भूजल पातळी कमी होणे, शेतीला धोका निर्माण होऊन तसेच पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका यासारख्या समस्या निर्माण होत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. संबंधित वाळू घाटावरील पुढील कार्यवाही पूर्ण होईपर्यंत उत्खनन व वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात कुठेही नियमबाह्य वाळू उत्खनन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिला आहे.

Related to this topic: