Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी हिंगोली महायुती

परभणी हिंगोली जिल्ह्यात महायुतीसह घटक पक्षांनी केला विजयाचा निर्धार

Parbhani-Hingoli Mahayuti: स्थानिक स्वराज्य संस्था परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या प्रचाराला हिंगोली जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे.


परभणी हिंगोली जिल्ह्यात महायुतीसह घटक पक्षांनी केला विजयाचा निर्धार

Parbhani-Hingoli Mahayuti |

 

आ. गुट्टे यांच्या पाठिंब्याने प्रचाराला बळ  
वसमत, हिंगोली येथे सईद खानच्या प्रचारार्थ बैठक...!

पाथरी (Parbhani-Hingoli Mahayuti) : स्थानिक स्वराज्य संस्था परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या प्रचाराला हिंगोली जिल्ह्यात चांगलाच जोर धरला आहे. वसमत आणि हिंगोली येथे झालेल्या बैठकींमधून महायुतीतील सर्व घटक पक्षांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयाची समीकरणे अधिक मजबूत होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

वसमत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. राजू नवघरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महायुतीचा धर्म पाळत सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांसाठी सईद खान यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगत त्यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. कळमनुरीचे शिवसेना आ. संतोष बांगर हे हिंगोली जिल्ह्यात महायुतीतील समन्वयाचा महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत आहेत. रविवारी अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने सईद खान यांनी त्यांची भेट घेतली.  दरम्यान, हिंगोली येथे आ. तानाजी मुटकुळे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सईद खान यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. माजी आ. गजानन घुगे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित असल्याने निवडणुकीसाठी एकसंध यंत्रणा उभी राहत असल्याचे संकेत मिळाले.

या बैठकींमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्यामुळे सईद खान यांच्या बाजूने वातावरण अधिक अनुकूल होत असल्याची चर्चा राजकीय स्तरावर सुरू आहे. संपूर्ण प्रचार मोहिमेत शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव हे सावलीप्रमाणे उमेदवारांसोबत राहून गाठीभेटी घेत असून समन्वयाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे वसमत, हिंगोली आणि गंगाखेड या तीनही ठिकाणी महायुतीतील विविध पक्षांचे नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याचे चित्र दिसून आले. गंगाखेड भेटीदरम्यान माजी आ.सिताराम घनदाट यांचीही सईद खान यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून त्यालाही राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

हिंगोली ठरू शकतो विजयाचा मजबूत गड !
हिंगोली जिल्ह्यातील एकूण १३० मतदारांपैकी तब्बल १११ मतदार महायुतीच्या घटक पक्षांशी संबंधित असल्याने हा जिल्हा सईद खान यांच्या विजयाचा भक्कम आधार मानला जात आहे. विशेष म्हणजे बैठकींमध्ये उपस्थित स्थानिक प्रतिनिधींनी महायुतीची सर्व मते एकत्रित राखण्याबरोबरच आपल्या वैयक्तिक संपर्कातून व स्थानिक समीकरणांच्या आधारे इतर सकारात्मक मतेही सईद खान यांच्या पारड्यात टाकण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील ही मोर्चेबांधणी निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आ. रत्नाकर गुट्टे यांच्या भेटीला राजकीय वजन...!
गंगाखेड येथे सोमवार १५ जून रोजी आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या निवासस्थानी सईद खान व महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी सदिच्छा भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभावी नेतृत्व मानल्या जाणार्‍या गुट्टे यांनी महायुतीच्या उमेदवाराला संपूर्ण सहकार्य व पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केल्याने निवडणुकीच्या प्रचाराला नवे बळ मिळाल्याची चर्चा आहे.