Gajanan Maharaj Palkhi Theft: गजानन महाराज पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भावीकांच्या दागिण्यावर डल्ला मारला.
गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतावेळेस चोरी; कोतवाली पोलीसात गुन्हा
परभणी (Gajanan Maharaj Palkhi Theft) : गजानन महाराज पालखी रविवार ५ जुलै रोजी परभणीतील नवा मोंढा परिसरात आली. या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भावीकांच्या दागिण्यावर डल्ला मारला. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विलास मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीत नमुद केले आहे की, रविवार ५ जुलै रोजी दुपारी ४:३० च्या सुमारास नवा मोंढा परिसरात गजानन महाराज पालखीचे दर्शन घेत असताना त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन लंपास करण्यात आली. (Gajanan Maharaj Palkhi Theft) घरी गेल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. नवा मोंढा परिसरात येवून चैन शोधत असतांना त्यांना अश्विनी मितेश भावसार याच्या गळ्यातील १२ हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र चोरीला गेल्याचे समजले. त्याच बरोबर राणी संदिप वाघमारे यांच्या गळ्यातून २१ हजार रुपये किंमतीची सोन्याचे मनी असलेली पोतही चोरीला गेली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीसात अनवोळखी चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यता आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे.