Breaking News
  • वर्धा जिल्ह्यात मागील २४ तासांपासून संततधार व रिमझिम पावसाची हजेरी
  • दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार
  • मनोज जरांगे आभिजीत दिपकेंच्या भेटीला
  • नाशिकमध्ये मनसेचं आंदोलन
  • बुलढाण्यात जंतर-मंतर लाठीचार्जचे तीव्र पडसाद; विद्यार्थ्यांची सरकारविरोधात स्वाक्षरी मोहीम
  • ठाकूरबुवांच्या समाधीस्थळी माऊलींचे तिसरे गोल रिंगण भक्तिरसात रंगले
  • जे.पी नड्डा, जितेंद्र सिंह आंदोलकांची भेट घेणार
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

परभणी वादळी वारा

परभणीत वादळी वाऱ्यात विजेच्या खांबासह रोहित्र आणि झाडे कोसळली...

Parbhani Stormy winds: रभणीतील गंगाखेड येथील शुक्रवर रात्री वादळी वाऱ्याने खळी गावासह शिवाराचा विद्युत पुरवठा खंडीत झाला. रोहित्र (डिपी) व अनेक खांब कोसलेल्या मातीत जनावरांचा पाण्याचा पुरवठा समस्या


परभणीत वादळी वाऱ्यात विजेच्या खांबासह रोहित्र आणि झाडे कोसळली

Parbhani Stormy winds |

 

खळी गावासह शिवारातील वीज पुरवठा खंडीत

परभणी (Parbhani Stormy winds) : गंगाखेड येथील वादळी वाऱ्यामुळे खळी गावासह शिवारातील अनेक विजेच्या खांबासह विद्युत पुरवठा करणारा रोहित्र (डीपी) व अनेक झाडे कोसळल्यामुळे शुक्रवार १२ जून रोजीच्या रात्रीपासून या परिसरातील वीज पुरवठा खंडीत झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड तालुक्यात शुक्रवार १२ जुन रोजी रात्री उशिराने वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात खळी गावातील विठ्ठल उंडाळकर यांच्या घरावर गावात विज पुरवठा करणारा सिमेंटचा खांब कोसळताच गावातील विद्युत पुरवठा खंडीत झाला. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हाणी झाली नाही. या बरोबरच खळी शिवारातील कृषी पंपांना विद्युत पुरवठा करणारा वसंतराव पवार यांच्या शेतातील रोहित्र तसेच सहा पेक्षा अधिक विजेचे खांब कोसळल्याने कृषी पंपाचा विज पुरवठा ही खंडीत झाला आहे.

तसेच खळी शिवरासह धारासूर शिवारात अनेक मोठं मोठी झाडे कोसळली आहे. यात (Parbhani Stormy winds) सुदैवाने कोणतीही जिवीत हाणी झाली नाही. खळी गावात कोसळलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत वाहिन्यांना अन्य आधार देत दुपारी ३ वाजेनंतर विज पुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र शिवारातील विद्युत पुरवठा खंडित झाला असल्यामुळे कृषी पंप बंद पडल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.