Parbhani Financial Fraud: लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक
जिल्हा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालयातील प्रकार
परभणी (Parbhani Financial Fraud) : लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक केली.१२ लाख ८० हजार १३६ रुपयांची आफरा तफर करण्यात आली हा प्रकार परभणी येथील जिल्हा सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग कार्यालय येथे घडला. याप्रकरणी एका कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्यांवर १३ ऑगस्टला नवा मोंढा पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.संजय कुमार पांचाळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी फिर्याद दिली आहे. परभणी येथील कार्यालयात नेमनुकीला असलेले कनिष्ठ लिपीक विरेंद्र मोरेश्वर सुतवने तसेच तत्कालीन आहरन व संवितरण अधिकारी डॉ.विद्या भोजराज सरपे (कुलदिपक)सद्याचे अधिकारी डॉ.पंढरीनाथ हरिभाऊ लखमवार यांच्या कार्यकाळात लिपीकाने लेखा व कोषागारमधुन एकुण चार वेळा शासनाची अधिकची एरीयस रक्कम स्वताच्या व्ययक्तीक खात्यावर घेतली.
याप्रकरणात उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजी नगर यांच्या आदेशाने त्रिस्तरीय चौकशी समितीने चौकशी केली. त्यामध्ये विरेंद्र सुतवणे यांनी १२ लाख ८० हजार १३६ रुपयांची रक्कम व्ययक्तीक खात्यावर घेतली असून डॉ.विद्या सरपे,डॉ.पंढरिनाथ लखमवार यांचे सदर बाबींकडे हलगर्जी,निष्काळजी पना झाल्याचे दिसून आले. या अधिकार्यांनी वेतन देयक योग्य आहे की नाही हे तपासने आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. २९ मे २०२० ते २५ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत रक्कम घेत शासनाची आर्थिक फसवणुक करण्यात आली. तिघांनीही संगणमत करुन आर्थिक फसवणुक करत स्वताचा आर्थिक लाभ मिळुन घेतल्याप्रकरणी नवा मोंढा पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास सपोनि शिंदे करत आहेत.